जालना नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर; राज्य सरकारने काढले आदेश

जालना नगरपालिका आता जालना महापालिका म्हणून ओळखली जाणार आहे. कारण राज्यातील 29वी महापालिका म्हणून जालना नगरपालिकेची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

Jalna Municipality declared as Municipal Corporation

जालना नगरपालिका आता जालना महापालिका म्हणून ओळखली जाणार आहे. कारण राज्यातील 29वी महापालिका म्हणून जालना नगरपालिकेची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. (Jalna Municipality declared as Municipal Corporation) याबाबतचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या संदर्भातील बैठक पार पडली होती. केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करत या संदर्भातील मागणी केली आहे. पण काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी या मागणीचा विरोध केला होता. पण अखेरिस आता नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी याबद्दलची अधिसूचना जारी करत घोषणा केली आहे.4

हेही वाचा – CM म्हणजे करप्ट मॅन;160 कोटींची कामं 263 कोटींना दिली,आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर गंभीर आरोप

गेल्या अनेक दिवसांपासून हा निर्णय घेण्याबाबत हालचाली सुरु होत्या. त्या पद्धतीने शासनाकडून प्रयत्न देखील करण्यात येत होते. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. औद्योगिक शहर, फळबागांसाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहराची वाढती लोकसंख्या पाहता जालना महानगरपालिका घोषित करावी, अशी मागणी करण्यात येत होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि माजीमंत्री अर्जून खोतकर हे शिंदे गटासोबत गेल्यानंतर जालना महापालिकेसाठी प्रामुख्याने जोरदार प्रयत्न केले गेले आणि याबाबत आज निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना याबाबत विचारण्यात आले होते. पण याबद्दल अजून तरी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे त्यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, त्याच्या काही वेळातच राज्य सरकारकडून निर्णय घेत याबाबतचे आदेश काढण्यात आले.

मराठवाड्यात जालना जिल्ह्याची वेगळी आणि महत्त्वाची ओळख आहे. स्टील उत्पादनाची औद्योगिक वसाहत म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे. राज्यभरातच नव्हे तर देशातील अनेक भागात जालना जिल्ह्यातून स्टीलची निर्यात केली जाते. त्यामुळे या शहरात मोठी औद्योगिक उलाढाल सुद्धा पाहायला मिळते. त्याचबरोबर कृषी क्षेत्राच्या दृष्टीने देखील जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. मोसंबी फळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन या जिल्ह्यात घेतले जाते. दिल्लीपर्यंत जालना जिल्ह्याची मोसंबी विक्रीसाठी जाते. राजकीयदृष्ट्या देखील जालना नेहमी चर्चेत असतो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे.