घर महाराष्ट्र ...तर सरकार कारवाई करणार ; मराठा समाजावरील लाठीचार्ज प्रकरणी नितेश राणेंची...

…तर सरकार कारवाई करणार ; मराठा समाजावरील लाठीचार्ज प्रकरणी नितेश राणेंची ग्वाही

Subscribe

भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले की, जालनामध्ये काल मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचे समर्थन कोणीच करू शकत नाही. तसंच, मराठा समाजाला बदनाम करणाऱ्या लोकांना सोडणार नाही, हे सरकार कारवाई करणार, असं म्हणत त्यांनी संपूर्ण मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे.

जालनाध्ये, 1 सप्टेंबर, शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राज्यभरातून मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या लोकांनी मोर्चा काढत सरकारचा निषेध केला आहे. तर याला आता राजकीय रंगही दिले जात आहेत. यावर बोलताना, भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले की, जालनामध्ये काल मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचे समर्थन कोणीच करू शकत नाही. तसंच, मराठा समाजाला बदनाम करणाऱ्या लोकांना सोडणार नाही, हे सरकार कारवाई करणार, असं म्हणत त्यांनी संपूर्ण मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे.(Jalna the government will take action Nitesh Ranes testimony in the lathicharge case against the Maratha community )

नेमकं काय म्हणाले नितेश राणे ?

नितेश राणे यांनी ट्वीट करत, मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर भाष्य केलं आहे.  जालनामध्ये काल मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचे समर्थन कोणीच करू शकत नाही. हा लाठीचार्ज मस्ती करून अधिकाऱ्यांनी केला असेल तर त्यांच्यावर आमचे सरकार कारवाई करणार. चूक नसलेल्या मराठा तरुणांवर चुकीचे गुन्हे दाखल होऊ देणार नाही..
मराठ्यांचे हित पाहणारे हे महायुती सरकार आहे. मराठा बांधवांना शांततेच आवाहन करेन, असं म्हणत मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही,  असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.

तोंडात बोळा घालून बसला आहे का?

- Advertisement -

तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे. शरद कोळी म्हणाले की, जालन्यात काल मराठा समाज बांधवांवर गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाठीचार्ज करण्यात आला. तिथल्या आंदोलकांवर आणि महिला भगिनीवर बेछू़ट लाठीमार केला गेला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. गोळीबार केला. परंतु लव्ह जिहाद केलेला भाजपचा नितेश राणे आता कोणत्या बिळात जाऊन बसला आहे? त्याचं तोडं आता शिवलं आहे का? तोंडात बोळा घालून बसला आहे का? अशा शब्दांत शरद कोळी यांनी टीकास्त्र डागलं आहे. परंतु नितेश राणे यांनी मात्र मराठा समाजावर आपली प्रतिक्रया तर दिलीच आहे. सोबतच ते मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातही सहभागी झाले होते.

(हेही वाचा: “इंडिया आघाडीवरून लक्ष विचलित करण्यासाठी लाठीमाराचे आदेश”, संजय राऊतांना संशय )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -