जालना : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी ‘महाविकास’ आघाडीचे वानखेडे यांची बिनविरोध निवड

जालना जिल्हा अध्यक्षपदी 'महाविकास' आघाडीचे वानखेडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

jalna zilla parishad elections 2020 maha vikas aghadi candidate uttam wankhede wins
जालना : जिल्हा अध्यक्षपदी 'महाविकास' आघाडीचे वानखेडे यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचा परिणाम आता स्थानिक निवडणुकांवर देखील जाणवत आहे. बीड जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर, आज जालना जिल्हा परिषद निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपाने माघार घेतली आहे. भाजपाच्या या भूमिकेमुळे जालना जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. महाराष्ट्रात आज जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, ‘महाविकास’ आघाडीच्या उत्तम वानखेडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५६ सदस्य असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २९ सदस्यांची आवश्यकता होती. त्यानुसार शिवसेनेकडे १४, राष्ट्रवादीकडे १३ आणि काँग्रेसकडे ५ सदस्य होते. त्यामुळे शिवसेनेच्या उत्तम वानखेडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अशी झाली निवडणूक

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे सदस्य असलेल्या उत्तम वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज आज दुपारी १ वाजता दाखल करण्यात आला होता. तर, अर्ज दाखल करण्याच्या वेळेपर्यंत भाजपाचा कोणताही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. याचे कारण म्हणजे पुरेस संख्याबळ. भाजपाकडून माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी प्रयत्न देखील केले. मात्र, संख्याबळाचा आकडा न जुळल्याने अखेर भाजपाने माघार घेतली असून जालना जिल्हा अध्यक्षपदी ‘महाविकास’ आघाडीचे उत्तम वानखेडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची वर्णी लागणार आहे.


हेही वाचा – विनोद तावडेंना लावलेला न्याय उदय सामंतांना लावला जाईल का?