घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजनलक्ष्मी सहकारी 50 लाखांचा दंड

जनलक्ष्मी सहकारी 50 लाखांचा दंड

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकच्या जनलक्ष्मी सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. या बँकेला रिझर्व्ह बँकेने 50 लाख 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जनलक्ष्मी बँकेने जमा खात्यांमधील रक्कमेची प्लेसमेंट आणि क्रेडिट इन्फोर्मेशन कंपनीज संबंधित निर्देशांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून दंडाची कारवाई करण्यात आली आहे, याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाईडवर दिली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 29 जुलै 2021 च्या आदेशाद्वारे द जनलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेला 50.35 लाख रुपयांचा दंड केला आहे. आरबीआयने ’प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांद्वारे ठेवींची नियुक्ती’ आणि ’क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांचे सदस्यत्व (सीआयसी)’वर आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल हा दंड करण्यात आला आहे. 31 मार्च 2019 रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आरबीआयने घेतलेली बँकेची वैधानिक तपासणी आणि त्यासंबंधीचा तपासणी अहवाल आणि संबंधित सर्व पत्रव्यवहाराची तपासणी, इतर गोष्टींबरोबरच, उपरोक्त निर्देशांचे पालन केले नाही असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे . यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने,ने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का केला जाऊ नये या बाबत बँकेला नोटीस जारी करण्यात आली होती . बँकेने नोटिशीला दिलेले उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीत बँकेने आपले म्हणणे मांडल्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. या बाबत रिझर्व्ह बँकेचे चीफ जनरल मॅनेजर योगेश दयाल यांनी वेबसाईडवर माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -