Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र जंत्र-तंत्र-मंत्र जादूटोणा यातच अडकलेत...; भीमाशंकर यात्रेवरून राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

जंत्र-तंत्र-मंत्र जादूटोणा यातच अडकलेत…; भीमाशंकर यात्रेवरून राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Subscribe

ठाणे बंदबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा.. काल G-20साठी ते दिल्लीत होते. आज भीमाशंकरला आहेत. ते तीर्थयात्रेतच व्यस्त आहेत. जंत्र-तंत्र-मंत्र जादूटोणा यातच ते अडकलेले आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

ठाणे बंदबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा.. काल G-20साठी ते दिल्लीत होते. आज भीमाशंकरला आहेत. ते तीर्थयात्रेतच व्यस्त आहेत. जंत्र-तंत्र-मंत्र जादूटोणा यातच ते अडकलेले आहेत, असा घणाघात ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. मराठा आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी ठाणे बंदची हाक दिली आहे. त्याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला. (Jantra tantra mantra witchcraft is stuck in this Sanjay Raut s procession to the Chief Minister Eknath Shinde from Bhima Shankar Yatra )

अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या G-20 परिषदेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत गेले होते. तिथे त्यांनी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात ते भीमाशंकर मंदिरात जात दर्शन घेणार आहेत. यावरूनच आता राऊतांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

दंगल होणं हे सरकारचं अपयश

- Advertisement -

साताऱ्यात दंगलसदृश्य परिस्थिती का निर्माण झाली? हे सरकारचं अपयश आहे. तसंच, मी आधीच म्हणालो होतो की, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्या-राज्यांत आणि देशात दंगली घडवल्या जाणार. आता तेच होत आहे, असं म्हणत त्यांनी केंद्र, राज्यसरकारवर गंभीर आरोप केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, G-20 मध्ये जाऊन सत्ताधारी पार्ट्या झोडत आहेत. त्यापेक्षा सरकारनं जालन्यात जावं. मनोज जरांगे पाटलांवर उपोषण करण्याची ही परिस्थिती का आली? त्यासाठी ईडी सीबीआय उपयोगी पडणार नाही. आज बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काय अर्थ आहे, असं राऊत म्हणाले.

(हेही वाचा: पालखी वाहायला कुणीच राहणार नाही; गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला )3

भाजपचंं हिंदुत्व खोटं 

- Advertisement -

राऊतांनी यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, राहुल गांधी बरोबरच बोलले. भाजप जे हिंदुत्व दाखवत आहे. ते हिंदुत्व नाही. ती हिंदुत्वाचे संस्कार, संस्कृती नाही. हा सगळा सत्तेचा खेळ भाजपकडून सुरू आहे.

- Advertisment -