घरताज्या घडामोडीJarange Vs Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय बारसकरांची प्रहार संघटनेतून हकालपट्टी

Jarange Vs Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय बारसकरांची प्रहार संघटनेतून हकालपट्टी

Subscribe

मुंबई – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी आज टीका केली. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी जरांगे यांच्यावर अनेक आरोप केले. मनोज जरांगे हे रोज खोटं बोलतात, पलटी मारतात असे आरोप अजय बारसकर यांनी केले. यानंतर बारसकर यांची आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.

अजय बारसकरांची प्रहार संघटनेतून हकालपट्टी

अजय बारसकर हे वारकरी संप्रदायातील प्रवचनकार आहेत. आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना आणि प्रहार वारकरी संघटनेशी ते संबंधीत होते. मनोज जरांगेवरील टीकेनंतर त्यांना संघटनेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरु असलेले आरक्षण आंदोलनाविषयी प्रहार संघटनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने जाहीर भूमिका मांडू नये असे आदेश आमदार बच्चू कडू यांनी बारसकर यांच्या बडतर्फीवेळी दिले आहेत.
अजय बारसकर यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाविषयी घेतलेली भूमका मान्य नाही, प्रहार संघटना त्यांचे समर्थन करत नाही, असे आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत.

- Advertisement -

कोण आहेत अजय बारसरकर

अजय बारसकर हे प्रवचनकार, किर्तनकार आहेत. त्यासोबतच त्यांनी दहापेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘तुका सेज’ हे संत तुकाराम महाराजांसंबंधी इंग्रजी पुस्तकाचे बारसकर लेखक आहेत.
अजय बारसकर हे त्यांच्या नावापुढे ह.भ.प. आणि महाराज शब्द लावतात. ते किर्तनकार, शाहिर, कवी, प्रबोधनकार, व्याख्याते, शिक्षक, कायद्याचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात.
बारसकरांनी 2005 पासून सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कामाला सुरुवात केली. महाराष्ट्रासह भारतभर ते किर्तन करतात.
अजय बारसकरांनी 2018 मध्ये पुण्यातील भंडारा डोंगर येथे संत तुकाराम ज्ञानपीठ संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा, संत तुकारामांच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -