घरमहाराष्ट्रनरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण

नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण

Subscribe

राज्यात ठिकठिकाणी 'जवाब दो' आंदोलनाचे आयोजन, सीबीआयने सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे हमीद दाभोळकरांची मागणी.

सामाजिक कार्यकर्ता आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या होऊन आज पाच वर्ष पूर्ण झाले. मात्र आरोपींचा शोध घेण्यास सरकार असमर्थ ठरल्यामुळे आज पुण्यात ‘जवाब दो’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी होऊन लोकांनी मारेकऱ्यांना अटक करावी अशी मागणी केली. मोर्चात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा मुलगा हमीद आणि मुक्ता दाभोळकर बरोबरच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव देखील उपस्थीत होते. २० ऑगस्ट रोजी नरेंद्र दाभोळकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या करण्यात आली होती. मात्र मारेकऱ्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आले. यानंतर हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेशण विभाग (सीबीआय)कडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई दिलासा देणारी असली तरीही याची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे हमिद दाभोळकर यांनी मोर्चादरम्यान  सांगितले.

“सीबीआयची कारवाई दिलासा देणारी आहे. मात्र या प्रकरणी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. दाभोळकरांही हत्या करण्यात आली तरी त्यांच्या विचाराची हत्या केली जाऊ शकत नाही.” – हमीद दाभोळकर

अखेर कुठपर्यंत पोहचला तपास

मागील पाच वर्षांपासून डॉ. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यास तपास यंत्रणांना यश आले नाही. मात्र  केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने पूण्याहून सचिन प्रकाशराव अंधुरे याला नुकतेच अटक केले. हत्येप्रकरणी सचिन हा मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतील नालासोपारा येथून संचिन अंधुरेला अटक करण्यात आले होते. सचिन हा दाभोळकरयांच्या हत्येप्रकरणातील आरोपी असल्याची माहिती अटके नंतरच्या चौकशीत उघडकीस आली. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -