घरताज्या घडामोडीसाताऱ्याचे जवान संदीप सावंत यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

साताऱ्याचे जवान संदीप सावंत यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

Subscribe

नववर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी जम्मू-काश्मीर येथील नौशेरा मधून दुःखद घटना समोर आली. या घटनेत दोन जवान शहीद झाले. मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं आहे. अवघ्या २५ वर्षीय संदीप यांच्यामागे पत्नी सविता या आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुंडे या गावाचे संदीप हे रहिवासी होते.

नववर्षाच्या पहाटे नियंत्रण रेषेवरील जंगलात संदीप यांच्या गस्ती घातलेल्या पथकाला हालचाली दिसल्या. त्यामुळे संदीप यांच्यासह पथकातील सर्व जवान सज्ज झाले. यादरम्यान त्यांनी दहशतवादी घुसखोरी करताना दिसले. कडाक्याच्या थंडीमुळे आणि दाट धुक्यामुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या दिसून आली नाही. म्हणून संदीप यांच्यासह पथकानी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान दहशवाद्यांशी लढताना संदीप आणि नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांना या घटनेत वीरमरण आले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली. तसंच लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी शोधमोहीमचे काम सुरू आहे.

- Advertisement -

पाकिस्तानकडून काही दिवसांपूर्वी नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानचा गोळीबाराला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिलं.


हेही वाचा – नववर्षाचं स्वागत करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -