घरताज्या घडामोडीजातीचा दाखला रद्द; जयसिद्धेश्वर स्वामींच्या खासदारकीवर टांगती तलवार

जातीचा दाखला रद्द; जयसिद्धेश्वर स्वामींच्या खासदारकीवर टांगती तलवार

Subscribe

जात पडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर स्वामींचा जातीचा दाखला खोटा ठरवत तो रद्द केला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. दक्षता समितीचा अहवाल जयसिद्धेश्वर स्वामींना मान्य नसून याविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहेत.

भाजपचे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी रद्द होणार असल्याची शक्यता आहे. जात पडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर स्वामींचा जातीचा दाखला खोटा ठरवत तो रद्द केला आहे. जयसिद्धेश्वर स्वामी हे सोलापूर या राखीव मतदारसंघाचे खासदार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार जयसिदेश्वर महाराज यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचा दाखला सादर केला होता. जातीचा दाखलाच रद्द झाल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होण्याची चिन्हे आहेत.

प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी स्वामींचा जातीचा दाखला खोटा असल्याचे सांगत खासदार जयसिद्धेश्वर स्वामींविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी नियुक्त दक्षता समितीने तपास करुन आपला अहवाल सादर केला. या अहवालात खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुराव्यांसाठी दाखल केलेला दाखलाही संशयास्पद असल्याचे समितीने सांगितले. दरम्यान, दक्षता समिती दबावात काम करत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास त्रयस्थ समितीमार्फत केला दावा, अशी मागणी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या वकिलाने केली होती. मात्र, जिल्हा जात पडताळणी समितीने हा अर्ज फेटाळात सुनावणी पूर्ण झाल्याचे जाहीर केले. दक्षता समितीचा अहवाल मान्य नसून याविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही जयसिद्धेश्वर स्वामी यांचे वकील संतोष नाव्हकर यांनी सांगितले होते.

- Advertisement -

सोलापूर हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असल्यामुळे या मतदारसंघातून इतर जातीचा उमेदवार निवडणूक लढवू शकत नाही. लोकसभा निवडणुकीवेळी जयसिद्धेश्वर स्वामींनी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र, त्यांचे मूळ प्रमाणपत्र हिंदू लिंगायत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -