घरमहाराष्ट्रपुणेमंदिर बांधायला निघाले?; देव तर अगोदरच्या शिवसेना भवनात, जयंत पाटलांचा टोला

मंदिर बांधायला निघाले?; देव तर अगोदरच्या शिवसेना भवनात, जयंत पाटलांचा टोला

Subscribe

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळी एमआयएमच्या 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांना शिंदे गटाच्या प्रति शिवसेना भवनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी प्रति शिवसेना भवनाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री शिंदेना टोला लगावला.

देव तर अगोदरच्या शिवसेना भवनात –

- Advertisement -

याविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मंदिर बांधायला निघाले आहेत. त्यामध्ये देव असणार का? कारण देव तर अगोदरच्या शिवसेना भवनात आहे… सोलापुरातील एमआयएमच्या सात नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाच्या सोहळ्यासाठी जयंत पाटील सोलापूर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दादरमध्ये नवे शिवसेना भवन –

- Advertisement -

शिवसेनेतले दोन तृतियांश आमदार खासदार फोडून ठाकरेंची शिवसेना खिळखिळी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी पुढील लक्ष्य ठरवले आहे. ज्या शिवसेना भवनातून जवळपास गेली ५ दशकं पक्षाचा कारभार चालला, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले गेले, अनेकांना जिथल्या तिथे न्याय दिला गेला, अनेकांच्या राजकीय आयुष्याला याच शिवसेना भवनातून कलाटणी मिळाली, त्याच शिवसेना भवनावर एकनाथ शिंदे दावा सांगणार, अशी चर्चा गेली काही दिवस सुरु होती. पण आता मुंबईच्या मध्यवर्ती भागातील दादरमध्ये नवे शिवसेना भवन उभारण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. लवकरच यासंदर्भातील पुढील पावलं उचलली जातील, अशी माहिती आहे.

सर्वेत भाजप-शिंदे गटाला धक्का –

इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. त्यावरून भाजप आणि शिंदे गटाने घडवून आणलेले सत्तांतर राज्यातील जनतेला फारसे आवडलेले नाही, याविषयी त्यांच्या मनात रोष आहे, असे अनुमान इंडिया टुडे आणि सी व्होटर्सच्या या सर्वेक्षणातुन दिसते. या सर्वेक्षणानुसार आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभेच्या ४८ जागा आहेत त्यापैकी ३० जागा महाविकास आघाडीला मिळतील. तर भाजपप्रणित एनडीएची १८ जागांपर्यंत घसरण होईल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -