Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र जयंत पाटलांना अश्रू अनावर; तर आव्हाड म्हणाले 'आम्ही कोणाकडे जायच..'

जयंत पाटलांना अश्रू अनावर; तर आव्हाड म्हणाले ‘आम्ही कोणाकडे जायच..’

Subscribe

शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यावेळी अश्रू अनावर झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मंगळवारी (ता. 5 मे) ‘माझे सांगाती… राजकीय आत्मकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. पण यावेळी शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील यावेळी अश्रू अनावर झाले तर जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील या सर्वांनी शरद पवार यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली. पण शरद पवार हे त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहायला मिळाले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना अश्रू अनावर
शरद पवार यांच्या पदावरून निवृत्त होण्याच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर जाऊन शरद पवार यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. पण यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे भावूक झाले. तर बोलताना आणि पवारांची मनधरणी करताना त्यांना रडू कोसळले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, “आत्तापर्यंत आम्ही सगळे महाराष्ट्रात साहेबांच्या नावाने मत मागतो. पक्षाला मतं पवारसाहेबांमुळे मिळतात. आज पवार साहेबच बाजूला गेले तर आम्ही कोणाला घेऊन लोकांच्या समोर जायचे, हा पहिला प्रश्न आहे. तर शरद पवार हे आजही या पदावर राहणे, सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेब या नावानेच ओळखला जातो. त्यामुळे त्यांनी असे अचानक बाजूला जाण्याचा त्यांनाही अधिकार नाही. त्यांनी असा निर्णय कोणालाही मान्य नाही,” असे बोलत जयंत पाटील हे भावूक झालेले पाहायला मिळाले.

- Advertisement -

आम्ही कोणाकडे जायचे, आव्हाड भावूक
जयंत पाटील यांच्यानंतर पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे सुद्धा भावूक झालेले पाहायला मिळाले. तर त्यांनी याबाबतचे एक ट्वीट देखील केले आहे. तर पवार यांची मनधरणी करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “कार्यकर्त्याच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे ओळखणारे तुम्ही आहात. साहेब वय याचा तुमच्यासाठी काही प्रश्न नाही. 2004 साली तुम्हाला नागपूरमध्ये जखम झालेली असताना तुम्ही प्रचार केलेला आम्ही पाहिलेले आहे. त्या तुलनेत आता तुमची तब्येत बरी आहे. अशा अवस्थेत तुम्ही पक्षाला सावरत पक्षाला सत्तेत कायम ठेवले. तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात होणे नाही. मी कधी तुमच्याकडे येतो, तुमचे दर्शन घेतो हे तुम्हाला त्या दिवशीच सांगितले. आता एवढ्या अडचणी सोबत असताना आम्ही कोणाकडे जायचे,” असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांना देखील अश्रू अनावर झाले.


- Advertisement -

हेही वाचा – भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण… शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राऊतांनी केलेले ट्वीट चर्चेत

- Advertisment -