घरमहाराष्ट्रसरकारमधील मंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम केलं जातंय; जयंत पाटलांचा आरोप

सरकारमधील मंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम केलं जातंय; जयंत पाटलांचा आरोप

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीविरोधात कंबर कसली असून सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहेत. यावरुन आता राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. सरकारमधील मंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम केलं जातंय, असा आरोप देखील जयंत पाटील यांनी केला आहे. तसंच, सोमय्या यांनी केलेल्या आरोप प्रकरणात हसन मुश्रीफ यांचा सहभाग असेल असं मला वाटत नाही, असं देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

धादांत खोटे आरोप करणे आणि मंत्र्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काही करण्यापेक्षा शासकीय यंत्रणांनी काही माहिती मागितल्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पूर्ण सहकार्य करतील. या प्रकरणात हसन मुश्रीफ यांचा सहभाग असेल असे मला वाटत नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. जाणीवपूर्वक सरकारमधील मंत्र्यांना बदनाम केले जात असल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisement -

सोमय्यांवर १०० कोटींचा दावा ठोकणार – मुश्रीफ

मी अनेक दिवसांपासून सांगत होतो, माझा पक्ष आणि पवार साहेबांवर आरोप झाले. त्याला मी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे माझ्यावर आरोप होणार ही खात्री होती. या आरोपांचा मी निषेध करतो, त्यांच्या CA पदवीवर शंका येते. या आधीच धाड पडली मात्र त्यांना काहीच मिळालं नाही. सोमय्या यांना यातील काही माहिती नाही. त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन माहिती घ्यायला हवी होती. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्या सांगण्यावरून हे आरोप झाले. मी सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार आहे, असा इशारा मुश्रीफ यांनी सोमय्या यांना दिला.

- Advertisement -

हेही वाचा – रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात ACB कडे तक्रार करणार – हसन मुश्रीफ


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -