घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023निवडणुका घ्यायला 'राम' का घाबरतोय; जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

निवडणुका घ्यायला ‘राम’ का घाबरतोय; जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

Subscribe

मुंबईः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला आता काहीच हरकत नाही. कोरोना काळात निवडणुका न घेण्याचे वैध कारण होते. आता तर गेल्या काही महिन्यांपासून तुमचे रामराज्य आले आहे. मग राम निवडणुका घ्यायला का घाबरतो आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटली यांनी शिंदे-फडणवीस सरकारला शुक्रवारी लगावला.

विधानसभेत जयंत पाटील यांनी सरकारला हा टोला हाणला. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्यावर राज्य शासनाचे नियंत्रण नसते. मग सरकार निवडणुका का घेत नाही. जनता आम्हाला विचारते की सरकार निवडणुका घ्यायला का घाबरते. पण आम्ही त्यांना समजावून सांगतो की तसं नाही. पण किती वेळ आम्ही जनतेला समजवणार आहोत. तेव्हा सरकारने निवडणुका तत्काळ घ्याव्यात, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

- Advertisement -

कोरोनाचा काळ होता. त्यामळे तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे शक्य नव्हते. तेव्हा निवडणुका न घेण्याचे वैध असे कारणही होते. मात्र आता तसे काही नाही. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला आता काहीच हरकत नाही. कारण गेले काही महिने तुमचे रामराज्य सत्तेत आले आहे. मग राम निवडणुका घ्यायला का घाबरतो आहे, असा मिश्किल सवाल जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील यांचे निवदेन सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात आले. त्यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याची मागणी केली.

दरम्यान, जयंत पाटील हे नेहमीच सरकारवर निशाणा साधत असतात. देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडल्यानंतर त्यांच्या दुःखाची व्याख्या जयंत पाटील यांनी सभागृहात गाणं म्हणून केली होती. जयंत पाटील म्हणाले होते की, फडणवीस यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली तेव्हा त्यांचा चेहरा बघण्यासारखा होता. त्यावेळी त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव लपवता आले नाही. मात्र आता त्यांना त्याची सवय झाली आहे. ते दुःख लपवायला शिकले आहेत. आता ते हसतात. तरीही त्यांच्याकडे बघून मला आठवत असलेल्या एका गाण्याच्या ओळी मी सर्वांसमोर मांडतो. कारण हा शेवटा अर्थसंकल्प असा समजूनच तो मांडण्यात आला आहे. त्यामुळे तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है, क्या दिखा रहे हो, असेच आता म्हणावे लागले, असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीस यांना हाणला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -