घरताज्या घडामोडीदेशापुढे तुझा आदर्श! लसीकरणाची 'ही' प्रतिज्ञा घेणार्‍या तरूणाचे जयंत पाटलांकडून कौतुक

देशापुढे तुझा आदर्श! लसीकरणाची ‘ही’ प्रतिज्ञा घेणार्‍या तरूणाचे जयंत पाटलांकडून कौतुक

Subscribe

मी आणि माझ्या कुटुंबाने मोफत लस घेतली तरी तेवढी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार

राज्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांनाही कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने १८ ते ४५ वर्षामधील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. यामुळे राज्य सरकारवर भार आला आहे. परंतु राज्य सरकारकडून मोफत लसीकरण केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तरीही सागर नावाच्या तरुणाने म्हटले आहे की, मी आणि माझ्या कुटुंबाने मोफत लस घेतली तरी तेवढी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार असे सांगितले आहे. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आहे. जंयत पाटील यांनी या तरुणाचे अभिनंदन करत देशाचा तरुण कसा असावा याचे उत्तम उदाहरण आपण दिले असल्याचे म्हटले आहे.

सागर नावाच्या तरुणाने म्हटले आहे की, राज्य सरकारने जरी मोफत लसीकरण केले तरी त्या लसीची रक्कम ही आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहे. तसेच त्या इतर तरुणांनाही आवाहन केले आहे. याची दखल जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली. यावर जयंत पाटलांनी म्हटले आहे की, सागर, सर्वप्रथम आपले अभिनंदन, देशाचा तरुण कसा आसावा याचे उत्तम उदाहारण आपण दिले आहे. आपल्यासारख्या प्रगल्भ विचारांच्या तरुणांमुळेच आपला देश, आपला महाराष्ट्र भविष्यात प्रगतीची वाटचाल करेल अशा आशयाचे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

तरुणाने काय आवाहन केले

सागर नावाच्या तरुणाने ट्विट करत म्हटले आहे की, मी आणि माझ्या कुटुंबाने तर ठरवलं आहे. महाराष्ट्र सरकारने लस मोफत केली असली तरी लसची जेवढी किंमत आहे तेवढी रक्कम आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करणार आहोत. ज्यांना शक्य असेल त्यांनी ही हे करायला हरकत नाही. राज्य सरकारवरचा थोडा भार कमी होईल.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्रात सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करणार, नवाब मलिक यांची माहिती


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -