घरताज्या घडामोडीपरदेशातून मदतीची विमाने भरुन येतायंत, महाराष्ट्राला काय मिळालं केंद्र सरकारने खुलासा करावा

परदेशातून मदतीची विमाने भरुन येतायंत, महाराष्ट्राला काय मिळालं केंद्र सरकारने खुलासा करावा

Subscribe

सध्या सांगली जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होत असल्याचे निर्देशनास आले आहे.

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाने हाहाकार घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यामध्ये भारताची त्रेधा तिरपीट उडाली आहे. देशातील वाढत्या कोरोना बाधितांची संख्या आणि रुग्णांचा मृत्यूदर पाहता काही देशांनी भारतासोबत व्यवहार,व्यापार, वाहतूक बंद ठेवली आहे. तसेच काही देश भारतासाठी वैद्यकीत संसाधने,उपकरणांच्या मदतीची विमाने भरुन येत आहेत. परंतु कोरोनामुळे वाढत्या तुटवड्यामध्ये ही संसधाने आणि मदत कुठे वितरित होत आहे. महाराष्ट्राला यामधून या मिळालं याचा खुलासा केंद्र सरकारने करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनचा आज पाचवा दिवस आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत जयंत पाटील बोलत होते.

सांगलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडकडीत लॉकडाऊन केला आहे. या लॉकडाऊनला ५ दिवसांचा कालावधी पुर्ण झाला आहे. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. सध्या जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. व्हेंटिलेटरची ऑर्डर दिली असून जिल्ह्यात अधिक ३० व्हेंटिलेटरची भर पडणार आहे. संख्या आणखी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरोग्य विभागातील अनेक जागा भरल्या जात आहेत, त्यामुळे कर्मचारी नाहीत अशी तक्रार आता होणार नाही. जिल्ह्यात ३० ऍम्ब्युलन्स घेतल्या, आणखी काही घेण्याचे विचाराधीन आहे. असल्याचे बैठकीत जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

परदेशातून आलेली मदत जातेय कुठं

परदेशातून आपल्या देशाला आरोग्य साहित्याची मदत होत आहे. टिव्हीवर पाहिलं की विमानं भरून येत आहेत पण महाराष्ट्राला यातलं अजून तरी काही मिळालेले नाही. याबाबत केंद्र सरकारच अधिक खुलासा करू शकेल असे जयंत पाटलांनी म्हटलंय.

- Advertisement -

जास्तीत जास्त लस मिळावी यासाठी प्रयत्न

९९% डॉक्टर, आरोग्यसेवक मनोभावे काम करत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर संशय घेणे अयोग्य आहे. रेमेडिसिवीरचा काळा बाजार होणार नाही याची खबरदारी घेत आहोत. मात्र काळाबाजार केल्यास कारवाई केली जाईल. शासनाने आरटीपीसीआरचे दर निश्चित केले आहेत. अधिकचे पैसे घेतल्यासही कारवाई केली जाईल. केंद्र सरकारकडून ज्या प्रमाणात लस येत आहे त्या प्रमाणात जिल्ह्यात लसीकरण केले जात आहे. शासन दुसऱ्या डोसला प्राधान्य देत आहे आणि त्याचप्रमाणे प्रशासन नियोजन करत आहे. १३ कोटी जनतेला लस देणे ही मोठी जबाबदारी आहे, आम्ही सर्वच जास्तीत जास्त लस मिळावी याचा प्रयत्न करत आहोत.

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला अर्थ नाही

देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते महाराष्ट्रावर टीका करतात त्यांच्या टीकेला आता काही अर्थ उरला नाही कारण पंतप्रधानांनी स्वतः महाराष्ट्राचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकारने खरंच चांगली कामगिरी केली आहे. आपण उत्तरेकडील राज्यांशी तुलना केली तर आपल्याला ते दिसेल. तिसऱ्या लाटेबाबतही आम्ही नियोजन करत आहोत, मात्र सध्या प्राधान्य दुसरी लाट थोपवणे हे आहे. प्रशासन संपूर्ण प्रयत्न करत आहेत. आम्ही नक्कीच यश मिळवू. नागरिकांनी जिल्ह्यातील लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. आपण ही शृंखला तोडण्यासाठी नक्की यशस्वी होऊ असे आश्वासन राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -