घरताज्या घडामोडीशिंदे गटाची ताकद मोठी, नव्या सेनाभवनावर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

शिंदे गटाची ताकद मोठी, नव्या सेनाभवनावर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

Subscribe

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाणाच्या चिन्हाबाबतचा वाद अद्यापही सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र, याबाबत कोणताही अंतिम निकाल लागलेला नाहीये. शिंदे गटाने नवे शिवसेना भवन उभारण्याची घोषणा करून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. दादरमध्ये प्रती सेनाभवन उभारण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एकनाथ शिंदे गट नवे सेनाभवन बांधू शकतात. कारण त्यांची ताकद फार मोठी आहे. सत्तांतरावेळी सुरतपासून जो प्रवास झाला त्यामधून त्यांनी ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे ते प्रतिसेनाभवन बांधतील. मात्र, मंदिर बांधले तरी त्या मंदिरामध्ये देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

दादरमधील मुख्यालय म्हणजे प्रति शिवसेना भवन नसून शिवसेना भवनाबद्दल कालही आदर होता आणि उद्याही राहील, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. उदय सामंत यांनी ट्विट करत मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. हा गैरसमज पसरवला जात आहे. मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य जनतेला भेटता यावं यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे.शिवसेना भवनबद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील, असं सामंत म्हणाले.

मुंबईवर ठाकरे गटाचं राज्य आहे, असा आभास निर्माण केला जातोय. मात्र मुंबईकर शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामं झाली नाहीत. एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जातील, शाखाप्रमुखांची घोषणा होईल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम जोरदार सुरू होईल. शिंदे साहेबांच्या कामाची गती पाहता त्यांना चांगल्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्येच त्यांचं एक मुख्य कार्यालय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शाखा काम करतील, असं शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी म्हटलंय.

- Advertisement -

हेही वाचा : ‘तो त्यांचा आवडता शब्द’ अजित पवारांचा शिंदे – फडणवीसांना खोचक टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -