माकड हनुमानाचा अवतार असल्याने आपण त्यांना काही करू शकत नाही – जयंत पाटील

for flood control Jayant Patil to discuss Almatti Dam with Karnataka Water Resources Minister
जयंत पाटील अलमट्टी धरणाबाबत कर्नाटक जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करणार, पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांना महत्त्वाचे निर्देश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सध्या माकड आणि हनुमानावर (Hanuman) कमेंट केली आहे. ते गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी एका शेतकऱ्यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी माकड आणि हनुमानावर कमेंट केली.

काय म्हणाले जयंत पाटील –

माकड हे हनुमानाचा अवतार आहे. आपण त्यांना काय करणार… आता आपण हनुमान (Hanuman) चालिसा म्हणतोय आणि त्या माकडांचा काय बंदोबस्त करणार, असे भाष्य जयंत पाटलांनी (Jayant Patil) हनुमान चालिसा प्रकरणावर केले. त्यांच्या या विधावनंतर हश्या पिकला. ते सांगलीत बोलत होते.

या प्रश्नाला दिले उत्तर –

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना एका शेतकऱ्यांने आमच्या भागात माकडांचा त्रास असल्याचे जयंत पाटील(Jayant Patil) यांना सांगितले. तुमच्या भागात झाडे जास्त आहेत. तरी इखडे माकडांचा त्रास नाही. मात्र आमच्या भागात आम्हाला खूप माकडांचा त्रास होतो. यावर काहीतरी योजना करा, असे शेकऱ्यांने सांगितले. यावर माकड हनुमानाचा (Hanuman) अवतार असल्याने आपण त्यांना काही करू शकत नाही, असा उपरोधीक टोला जयंत पाटील यांनी लगावला. जयंत पाटलांच्या (Jayant Patil) बोलण्याचा अर्थ लक्षात आल्यावर लोकांच्यात हास्याचे फवारे उडाले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी जयंत पाटील यांच्या समोर समस्या सांगितल्या काहीवर त्यांनी लगेच तोडगा काढला. मात्र त्यांना माकडाच्या प्रश्नावर त्यांनी हे वेगळे उत्तर दिले.