घरताज्या घडामोडीतौत्के चक्रीवादळाचा फटका पाच राज्यांना परंतु गुजरातशिवाय कोणालाही मदत नाही - जयंत...

तौत्के चक्रीवादळाचा फटका पाच राज्यांना परंतु गुजरातशिवाय कोणालाही मदत नाही – जयंत पाटील

Subscribe

भाजप फक्त गुजरातसाठीच आहे का?

तौत्के चक्रीवादळाचा फटका देशातील ६ राज्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त गुजरातची पाहणी दौरा करुन नुकसानीचा आढावा घेतला यामध्ये त्यांनी गुजरातला १ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यावरु राष्ट्रवादीचे नेते व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मागील वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळात दिलेली मदतही अल्प होती. यावर्षी ६ राज्यांना तडाखा बसला असून मदतीची घोषणा फक्त गुजरातसाठी करण्यात आली आहे. भाजप फक्त गुजरातसाठी आहे का असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण उद्ध्वस्त झाले होते. त्यावेळी केंद्र सरकारने अगदी अत्यल्प मदत दिली होती. यानंतर आता तौत्के चक्रीवादळाचा देशातील ६ राज्यांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र आणि गोव्याला अधिक नुकसान झाले आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त गुजरातसाठी मदत जाहीर केली आहे. असे ट्विट राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच भाजप फक्त गुजरातसाठीच आहे का? असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान महाराष्ट्राला १५०० करोड मदत देतील – संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत मुंबईत माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी भाजवर निशाणा साधला आहे. तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका राज्यांना बसला आहे. गुजरातची पाहणी करुन मोदींनी १ हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी दिलदार आहेत महाराष्ट्रालाही ते १ हजार ५०० कोटींची मदत जाहीर करतील तसेच गोव्याला मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तिकडे ५०० कोटींची मदत करतील असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. मोदींनी गुजरातला मदत केली म्हणून आम्हाला दुःख असण्याचे कारण नाही परंतु कधीतरी पंतप्रधानांचे विमान महाराष्ट्राकडे वळे अशी आशा करतो असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -