घरताज्या घडामोडीएखाद्याचे मतपरिवर्तन कमी कालावधीत कसे काय होऊ शकते?, जयंत पाटलांनी केले आश्चर्य...

एखाद्याचे मतपरिवर्तन कमी कालावधीत कसे काय होऊ शकते?, जयंत पाटलांनी केले आश्चर्य व्यक्त

Subscribe

मुंबई – एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते ?, असे आश्चर्य माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त करत आज सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीच हे विधेयक अस्तित्वात येणे कसे चूक आहे यासाठी वकिली केली होती. त्यावेळी त्यांचा उत्साह इतका होता की आम्हीही प्रभावित होऊन त्यांच्या सूचनेला पाठिंबा दिला. त्यांनी इतकी चांगली वकिली केली की देवेंद्र फडणवीसही त्यांना विरोध करू शकले नाही. आज ते पुन्हा सांगत आहेत की थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडायचे यावर जयंत पाटील यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.

- Advertisement -

सरपंच, नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणुक घेण्यासंबंधीचे विधेयक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मांडले. यावर बोलताना जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.


हेही वाचा : गणेशोत्सवासाठी पोलीस ‘ इन अ‍ॅक्शन मोड’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -