घरताज्या घडामोडीकोरोना लस घेण्याबाबत जनजागृती आणि इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार, जयंत पाटील...

कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती आणि इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार, जयंत पाटील यांची माहिती

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यावर्षी ८१ वर्ष पूर्ण होत असून कोरोनामुळे यावर्षी शरद पवार व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. अशी माहिती देतानाच भेटण्यासाठी कुणीही येऊ नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करुन रविवार दिनांक १२ डिसेंबर रोजी नेहरु सेंटर वरळी येथे सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडणार आहे. वाढदिवसानिमित्त होणारी ही अभूतपूर्व व्हर्च्युअल रॅली पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी पक्षाच्यावतीने नवीन उपक्रमाची घोषणा करत असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होण्याकरिता एका महत्वाच्या अ‍ॅपचे उद्घाटन होणार असून विद्यार्थी संघटनेला ‘महाराष्ट्र युथ कार्निवल’ असा आगामी काळाकरीता विशिष्ट कार्यक्रम देण्यात येणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

१४ ते २० डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाची फादर बॉडी, फ्रंटल व सेलच्या विभागामार्फत सभासद नोंदणी कार्यक्रम, आरोग्य, रक्तदान शिबीर, औषध वाटप, वृक्ष लागवड, पर्यावरण विषयक कार्यक्रम, याशिवाय कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष व माजी आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित होते.


हेही वाचा: SBI Alert: पुढील २ दिवसांसाठी बंद राहणार इंटरनेट बँकिंग सेवा, जाणून घ्या कारण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -