Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रJayant Patil : ... पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा विरोधकांवर...

Jayant Patil : … पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा विरोधकांवर हल्लाबोल

Subscribe

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष इस्लामपूर मतदारसंघाचे उमेदवार जयंत पाटील यांनी कुटुंबासमवेत साखराळे या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, 23 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा कळेल की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमानाने जपणारा महाराष्ट्र आहे. तसेच हे महाराष्ट्राला खरेदी करायला निघाले आहेत. मात्र महाराष्ट्र स्वाभिमानी आहे तो विकला जाणार नाही.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावल्याचे दिसून आले आहे. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष इस्लामपूर मतदारसंघाचे उमेदवार जयंत पाटील यांनी कुटुंबासमवेत साखराळे या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, 23 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा कळेल की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमानाने जपणारा महाराष्ट्र आहे. तसेच हे महाराष्ट्राला खरेदी करायला निघाले आहेत. मात्र महाराष्ट्र स्वाभिमानी आहे तो विकला जाणार नाही. (Jayant patil sharp attack on BJP.)

हेही वाचा : PHOTO : ‘महा’उत्सवात मुख्यमंत्री शिंदेंसह दिग्गजांचा सहभाग, बजावला मतदानाचा हक्क

- Advertisement -

तसेच माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या मतदारसंघाने मला नेहमीच भरघोस मतांनी विजयी केले आहे. त्यामुळे यंदा देखील माझी जनता मला भरघोस मतांनी निवडूण देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातमध्ये महाविकास आघाडीचेच उमेदवार मोठ्या संख्येंने निवडून येतील, असेही ते म्हणाले आहेत. तसेच राज्यात बहुमताने महाविकास आघाडीचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आता सत्तेत असणारे हे लोक महाराष्ट्रला खरेदी करायला निघाले आहेत. मात्र महाराष्ट्र स्वाभिमानी आहे तो विकला जाणार नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : Sharad Pawar : “अजितदादांवर कसला अन्याय झाला? चारवेळा उपमुख्यमंत्री, सगळी सत्ता त्यांच्याकडे अन्…”, शरद पवारांनी फटकारलं

- Advertisement -

मंगळवारी घडलेल्या विनोद तावडेंच्या कथित आरोपांवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना नालासोपारा येथे पैशांसह पकडण्यात आले होते. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तसेच ते प्रकरण दाबण्यासाठी सुप्रिया सुळेंचा ऑडिओ क्लिपचे प्रकरण उगाचच समोर आणण्यात आल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी भाजपा हा पक्ष खोटा बोलणारा आणि पक्ष फोडणाराही असल्याचे म्हणत त्यांनी टीका केल्याचे दिसून आले आहे. भाजपाचे लोक असे वागतात हे दुर्दैवी असल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -