घरताज्या घडामोडीव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येतेय, समाज किती पेटून उठतोय याचं टेस्टिंग सुरू..; जयंत पाटलांचा हल्लाबोल

व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येतेय, समाज किती पेटून उठतोय याचं टेस्टिंग सुरू..; जयंत पाटलांचा हल्लाबोल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्तिस्वातंत्र्य आणि भाजप, राज्यपालांकडून झालेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थि करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. समाज किती पेटून उठतोय याचं टेस्टिंग सुरू असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

सांगली जिल्ह्यातील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आज व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत आहे. कारण राज्यपाल इतके बोलले तरी आम्ही गप्प आहोत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भीक वक्तव्याचा पुनरुच्चार करत, वादग्रस्त वक्तव्य करून समाज किती पेटतो याचं टेस्टिंग सुरु असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

समान नागरी कायदा आणला जात आहे. परंतु तो कायदा कसा असेल याची कल्पना नाही. देशातील आरक्षणाचे अधिकार काढून घेणार नाहीत ना अशी भीती वाटू लागली आहे. कृष्णा काठच्या लोकांनी इंग्रजांना वाकवलं आहे. कृष्णा काठचे लोक कधीही झुकणार नाहीत. यामधील भारत पाटणकर आहेत. लढा कशासाठी दिला, रक्त का सांडले?, हे पुन्हा पुन्हा नव्या पिढीला सांगायला हवे. वाळवा तालुका हा स्वातंत्र्यसैनिकांची, क्रांतिकारकाची भूमी राहिली आहे. नव्या पिढीला हा इतिहास किती माहिती आहे याबद्दल साशंकता आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

इंदूमती पाटणकर या त्यावेळी क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. आजच्या लव जिहादच्या आंदोलनाच्या काळात एकेकाळी 50 पेक्षा जास्त लग्न कासेगावमधून प्रेमविवाह आंतरजातीय विवाहाला इंदूताई पाटणकरांकडून प्रोत्साहन दिले जात होते, असंही जयंत पाटील म्हणाले.


हेही वाचा : शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -