घरताज्या घडामोडीतब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर

तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज सकाळपासून ईडी चौकशी सुरु होती. तब्बल 9.30 तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर आले आहे. यावेळी ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. जयंत पाटील साधारण १२ वाजता ईडी कार्यालयात गेले होते. त्यानंतर रात्री ९.२५ वाजता ते कार्यालयातून बाहेर आले. यानंतर त्यांना पुन्हा चौकशीला बोलावले जाणार आहे का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

“सकाळपासून तुम्ही ईडी कार्यालयाबाहेर आहात. तुम्ही सगळ्यांनी सकाळपासून इथे थांबला आहात. मला समर्थन दिले त्याबद्दल तुमचे आभार. त्यांच्या प्रश्नाला मी संपूर्ण प्रतिसाद दिला आहे. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची मी उत्तरं दिली. त्यामुळे आता त्यांच्याकडे काही प्रश्न बाकी असतील असे मला वाटत नाही”, असे ईडी चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर जयंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दुपारी 12:15 वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. IL & FS प्रकरणी ईडी कार्यालयात जयंत पाटील यांनी आपला जबाब नोंदवला. आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या चौकशीविरोधात मुंबईसह विविध ठिकाणी निदर्शने केली.

ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर अखेर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी चौकशीला सामोरे गेले. परंतु ते जाण्यापूर्वी मोठया प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ईडी कार्यालय आणि राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर पाहिला मिळाली. ईडी चौकशीविरोधात मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर तंसच इतर जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन केले.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

  • 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीच कॉन्ट्रॅक्ट संबंधित कंपनीला देण्यात आलं होतं.
  • संबंधित कंपनीकडून सब कॉन्ट्रॅक्टरला कंत्राट देण्यात आलं. सब कॉन्ट्रॅक्टरने कथितरित्या जयंत पाटील यांच्याशी निगडित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे.
  • ज्यावेळी हे पैसे देण्यात आले त्यावेळीं जयंत पाटील राज्याचे गृहमंत्री होते.

हेही वाचा – परळ-टीटी ब्रीजवर दुचाकी, अवजड वाहनांना १ जूनपासून प्रवेश बंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -