Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भुजबळांबाबतच्या निर्णयावर समाधान, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

भुजबळांबाबतच्या निर्णयावर समाधान, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

निर्दोष प्रकरणं असूनही महाराष्ट्रातील नेत्यांवर जाणीवपुर्वक वेगवेगळे आरोप करण्यात येतायत

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाल्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भुजबळांबाबतच्या निर्णयाचे समाधान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील नेत्यांविरोधात ईडी आणि सीबीआय लावण्याचा उद्योग काही लोकं करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. छगन भुजबळ यांच्याविरोधात केलेले आरोप न्यायालयाच्या निर्णयामुळे निष्फळ ठरला आहे. छगन भुजबळ यांनी ज्या प्रकारे प्रकरणाचा सामना केला आहे त्याचे मला कौतुक वाटत असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांना निर्दोष मुक्त केल्यामुळे समाधान व्यक्त केलं आहे. जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, भुजबळांविरोधातील आरोप हे खोटे आहेत याच्यात काही तथ्य नाही. पण फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर आक्षेप ठेवण्यात आले त्याच्याच आधारावर ईडीची कारवाई झाली. त्या चौकशीचा आधार घेत अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले. प्रसंगी त्यांना तुरुंगावास भोगावा लागला पण आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. हेच आम्ही सुरुवातील म्हणत होतो.

- Advertisement -

आपल्याला लक्षात येईल की अशी अनेक निर्दोष प्रकरणं असूनही महाराष्ट्रातील नेत्यांवर जाणीवपुर्वक वेगवेगळे आरोप करणे, त्यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआय आणनं हा उद्योग महाराष्ट्रातील काही लोकं करत आहेत. हे मूर्तिमंत उदाहरण आहे की, छगन भुजबळ यांच्याविरोधात केलेले आरोप हे निष्फळ ठरत आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने छगन भुजबळ यांना साथ दिली आहे. लोकांना विश्वास होता की, त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येईल. राष्ट्रावादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला समाधान आहे. त्यांच्यावर अनेक आरोप झाले पण कौतुक वाटत आहे की, सगळ्या त्रासाचा छगन भुजबळ यांनी सामना केला आहे. अशी प्रतिक्रया जयंत पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे. एसीबीने न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांचा अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्याला मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.


- Advertisement -

हेही वाचा : ‘सत्य परेशान हो सकता है लेकीन…’, महाराष्ट्र सदनप्रकरणी दोषमुक्त झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया


 

- Advertisement -