घरताज्या घडामोडीगृहखातं कुणाकडे जाणार? जयंत पाटील यांनी केला खुलासा

गृहखातं कुणाकडे जाणार? जयंत पाटील यांनी केला खुलासा

Subscribe

गृहखात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असून, यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक पार पाडली असून, विस्तारानंतरच गृहखाते कुणाकडे जाणार असे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रीपदाची यादी तयार झाली असून, थोड्याच वेळात ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे देखील जयंत पाटील यावेळी म्हणालेत.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील –

राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार झाली असून, ही यादी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात येणार असून, रात्री उशिरापर्यंत मंत्रीमंडळात कुणाचा समावेश करण्यात आला आहे हे कळेल. तसेच मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खाते वाटप होईल असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्याचा असून, एकमेकांची खाती एकमेकांकडे जातील असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान घटक पक्षांच्या नाराजीवर जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी घटक पक्षाचे आम्हाला सहकार्य लाभेल असे सांगितले. तसेच आम्ही जास्तीत जास्त खाती भरणार असे देखील ते यावेळी म्हणालेत.

- Advertisement -

हे वाचा – राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना मंत्रिपद? पाहा संभाव्य मंत्र्यांची यादी

 

हे वाचा – राष्ट्रवादी-काँग्रेसची यादी तयार; मात्र शिवसेनेचे संभाव्य मंत्री फोनच्या प्रतिक्षेत

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -