घरताज्या घडामोडीराष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये फाटाफूट काही होणार नाही, सरनाईकांच्या पत्रावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये फाटाफूट काही होणार नाही, सरनाईकांच्या पत्रावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

Subscribe

शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची मागणी केली तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय अस्वस्थता या पत्रामुळे निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या पत्रामुळे राष्ट्रवादी-शिवसेनेत कोणतंही वितुष्ट निर्माण होणार नाही असे म्हटलं आहे. ज्यांनी पत्र लिहिले आहे त्यांच्या मतदारसंघात काही घडलं आहे का याबाबत पाहायला पाहिजे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्र्वादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रताप सरनाईक यांच्या पत्राविषयी प्रश्न करण्यात आला होता. राष्ट्रवादी शिवेसनेला कमकुवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, मला वाटत नाही की त्यांचा तो भाव असेल. शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत कुणी गेलंय असा अता झालेलं नाही. परंतु अशा पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत वितुष्ट निर्माण होईल अस मला वाटत नाही. ज्यांनी हे पत्र लिहिले आहे त्यांच्या मतदारसंघात काही झाले आहे का, हे तपासले पाहिजे. असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांची पत्रावर टाळाटाळ

शिवेसना नेते संजय राऊत यांना सरनाईक यांच्या पत्राबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. परंतु संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, महापालिका निवडणूक आणि इतर गोष्टींबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. यावर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की, विनाकारण त्रास दिला जात आहे. हा त्रास कोण कोणाला का देत आहे. याबाबत अभ्यास सुरु आहे. सरनाईक यांना त्रास दिला जात आहे आणि जर या त्रासाला कंटाळून हे पत्र लिहिले असेल तर तो विनाकारण त्रास काय असेल याचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

भाजपशी जुळूवन घ्या

राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे.ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्‍त करतो असे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

आपल्या निर्णयामुळे बदनामीला आळा बसेल

सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. कोणताही गुन्हा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाला व शिवसोनेमुळे माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाई कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे , त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -