घरताज्या घडामोडीअवैध सावकारीवर लवकरच आळा बसणार - जयंत पाटील

अवैध सावकारीवर लवकरच आळा बसणार – जयंत पाटील

Subscribe

राज्यातील अवैध सावकारींना आळा घालण्यासाठी आणि अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा सहकार मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी नागपूरात केली. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शुक्रवारच्या पाचव्या दिवशी आमदार विद्या चव्हाण यांनी नियम ९३ अन्वये अवैध सावकारी संदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकाळ चर्चेला उत्तर देताना पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. या समितीत चव्हाण यांच्यासह इतर सदस्यांचा देखील अंतर्भाव केले जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सदस्य ख्वाजा बेग, सुरेश धस, गिरीश व्यास यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या शिफारसीसाठी समिती

जयंत पाटील म्हणाले की, ‘माजी मंत्री आर. आर. पाटील यांनी अवैध सावकारी विरोधात कायदा आणला. या कायद्याची कडक अमंलबजावणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत. मात्र, अवैध सावकरांविरुद्ध सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी तसेच अवैध सावकारी कायद्यात सुधारणा सुचविण्याचे काम ही समिती करणार आहे.’ त्याचबरोबर ‘या समितीमध्ये विधानपरिषद सदस्य सर्वश्री ख्वाजा बेग, सुरेश धस, गिरीश व्यास यांचा समावेश असेल. अवैध सावकारांना जरब बसविण्यासाठी या समितीने सुचविलेल्या सुचनांची समावेश कायद्यात करण्यात येईल’, असे देखील पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -