घरताज्या घडामोडीराणेंचे वक्तव्य हे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य समजावे लागेल,जयंत पाटीलांची टीका

राणेंचे वक्तव्य हे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य समजावे लागेल,जयंत पाटीलांची टीका

Subscribe

राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असे बोलणे हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे.

केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे वक्तव्य समजावे लागेल. कारण त्यांनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंगळवारी केली.

राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असे बोलणे हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणुक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन राज्याला आणि देशाला कळली, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

- Advertisement -

अशा पध्दतीने बोलणार्‍या लोकांना प्रत्येक राजकीय पक्षांनी किती महत्त्व द्यायचे यावर विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला भले राग असेल किंवा भाजपला उध्दव ठाकरेंचा द्वेष असेल, राग असेल तरी ही भाषा महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही, असे पाटील म्हणाले.जनतेने निवडलेल्या मुख्यमंत्र्यांचा हा अपमान असून ज्यावेळी मुद्दे संपतात त्यावेळी माणूस गुद्दयावर येतात. भाजपचे मुद्दे संपलेले आहेत हे यावरून स्पष्ट दिसत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

पेट्रोल, डिझेलचे दर वाढले म्हणून जन आशीर्वाद यात्रा?

दरम्यान, जन आशीर्वाद यात्रा कशासाठी? पेट्रोल, डिझेलच्या आणि गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की महाराष्ट्रात आणि देशात महागाई वाढवली म्हणून? आणि जनतेने आशीर्वाद कशासाठी द्यायचा? असा उपरोधिक सवालही जयंत पाटील यांनी केला. या देशात कधी केंद्रीय मंत्री झाले नाहीत का? की केंद्रीय मंत्री कुणी कधी बघितले नाहीत?त्यामुळे ही जन आशीर्वाद यात्रा हास्यास्पद असल्याची टीका पाटील यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – भाजप ठाकरे सरकारचं थडगं उभारल्याशिवाय राहणार नाही – प्रमोद जठार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -