Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी '...तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय' जयंत पाटलांचा मोदींवर...

‘…तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय’ जयंत पाटलांचा मोदींवर निषाणा

योगी आदित्यनाथ यांच्या कौतुकावरून जयंत पाटलांचा मोदींना टोला

Related Story

- Advertisement -

आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच हे जयंत पाटील यांचं वाक्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारचं कोरोना काळातील कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौतुकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. (jayant patil slam PM narendra modi )

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये योगी सरकारने अभूतपूर्व काम केलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने चांगलं काम केलं आहे अशी स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली त्यावर ‘उत्तरप्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली. अशा परिस्थितीत उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगली हाताळली असं म्हटलं जात असेल तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार मी करतोय !’ असं म्हणत जयंतराव पाटील यांनी मोदींना टोला लगावला आहे.

 

मोदी काय म्हणाले?

- Advertisement -

पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी बीएचयू मैदानावर एक बटण दाबून १५८३ कोटींच्या २८० योजनांचे उद्घाटन करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला. त्यावेळी बोलताना मोदींनी उत्तर प्रदेश हा संपूर्ण देशात सर्वाधिक कोरोना चाचणी करणारे राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये लसीकरण देखील सर्वात जास्त वेगाने झाले. कोरोनाच्या उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाची दुसरी लाट उत्तमरित्या हाताळली. लसीकरण मोफतरित्या उपलब्ध करुन दिली. त्याचप्रमाणे ऑक्सिजन,आयसीयू असा प्रत्येक ठिकाणी यूपी सरकारने कौतुकास्पद कामगिरी केली.


हेही वाचा – वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५८३ कोटींच्या २८० योजनाचं केलं उद्घाटन

 

 

- Advertisement -