चंद्रकात पाटील – रावसाहेब दानवे शिवसेनेत जाण्याची शक्यता, जयंत पाटील यांच्या वक्तव्यानं खळबळ

मागील दोन दिवसांपासून शिवसेनेत दोन जण येणार असल्याचे दिसत आहे. यामुळे ते दोन जण हेच असावेत

jayant patil slams bjp Chandrakat Patil - Raosaheb Danve likely to join Shiv Sena
चंद्रकात पाटील - रावसाहेब दानवे शिवसेनेत जाण्याची शक्यता, जयंत पाटील यांच्या वक्तव्यानं खळबळ

आजी-माजी मंत्री म्हणू नका. येत्या तीन-चार दिवसांत काय ते तुम्हाला दिसून येईल असे वक्तव्य भाजप चंद्रकांत पाटील यांनी केलं होते. चंद्रकांत पाटलांच्या विधानावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ माजली आहे. चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याचे विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना नागालँडचे राज्यपाल करणार असतील असा खोचक टोला लगावला आहे. तसेच शिवसेनेत आल्याशिवाय चंद्रकांत पाटील यांना आजी होता येणार नाही असे मिश्किल वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देऊन राजीकय वर्तुळात चर्चांना उधाण आणलं आहे. जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून शिवसेनेत दोन जण येणार असल्याचे दिसत आहे. यामुळे ते दोन जण हेच असावेत असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेमध्ये आल्याशिवाय आजी होता येणार नाही असा चिमटाच जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना घेतला आहे.

महाविकास आघाडीत मतभेद नाहीत

महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून सरकार स्थिर आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून भाजप नेते हे सरकार कधीही पडेल असे बोलत आहेत.त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटलांनी केली लहानग्याची इच्छा पुर्ण

वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा-दुधगाव रस्ता, बागणी-ढवळी-बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव-भडखंबे-बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचा शुभारंभ करण्यासाठी जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी कामांचा शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडण्यात आले. यावेळी गावातील एक ६ वर्षीय संचितही उपस्थित होता. थोर-मोठ्यांना नारळ फोडताना पाहून संचितनेही हिंमतीने साहेब मी पण नारळ फोडू का? असे जयंत पाटील यांना विचारले. यावेळी जयंत पाटील यांनी ६ वर्षीय संचितची इच्छा पुर्ण करुन लोकांची मने जिंकली आहेत. जयंत पाटील नेहमीच टप्प्यात कार्यक्रम करत असतात यावेळी जयंत पाटील यांनी संचितची इच्छा पुर्ण करुन लोकांची मने पुन्हा एकदा जिंकली आहेत.


हेही वाचा :  अजित पवार नक्की राज्याचे उपमुख्यमंत्री की पिंपरी चिंचवडचे, चंद्रकांत पाटलांचा टोला