घरताज्या घडामोडी'हे तर मगरमच्छचे अश्रू'; जयंत पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल

‘हे तर मगरमच्छचे अश्रू’; जयंत पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Subscribe

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रश्नावरुन विधासभा आणि विधान परिषदेत निवेदन देताना वित्त मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल चढविला. विरोधकांची ही ओरड म्हणजे मगरमच्छचे अश्नु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. जसा बाडगाला जोर आहे, तसा आमच्यातील काही आमदार तिथे गेलेल्यांना जोर असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही केंद्राकडे मदत मागितली असल्याचे जाहीर करतानाच त्यांना वाऱ्यावर सोडले नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, ‘राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ६ हजार ६00 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी २१०० कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत’. त्याचबरोबर ‘अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य शासनाने १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे’, अशी माहिती मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

जयंत पाटील म्हणाले की, ‘राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या ६६०० कोटी रुपयांपैकी २१०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरीत केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. तर राज्य शासनाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ७४०० कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ७२०० कोटी रुपये अशी एकूण १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.’

दरम्यान, विरोधकांवर हल्लाबोल चढविताना जयंत पाटील म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांसाठी मदत देण्यास सुरुवात केल्याने विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. विरोधक ‘सामना’ कधी पासून वाचयला लागले? असा प्रश्न उपस्थित करतानाच आपण कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणर नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभे राहणार असून मदतवाटपाचे कामकाज सुरु केले आहे. तर विरोधकच शेतकऱ्यांपासून दूर झाल्याने ते गोंधळ करीत असल्याची टीका देखील जयंत पाटील यांनी यावेळी केली.

- Advertisement -

जयंत पाटील यांनी फडणवीसांना खडसावले

आगस्ट , सप्टेंबर आणि आक्टोबर असे तीन राज्यांत भाजपप्रणित सरकार राज्यात सत्तेवर होते. आता शेतकऱ्यांसाठी सभागृहात गळे काढणाऱ्यांना सत्तेत असतांना तीन महिने शेतकऱ्यांना मदत करण्यापासून कोणी अडवले होते? त्यांचा हात कोणी धरला होता? अशा शब्दात जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खडसावले. तसेच इतकेच जर यांना पुळका आता आला असेल तर त्यांनी केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार सत्तेत असतांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याने जी १४ हजार ६०० कोटींची मदत मागितली आहे, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आमच्याबरोबर यावे असा सणसणीत टोलाही लगावला.

विधानसभेत आज विरोधकांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सभागृहाचे कामकाज प्रचंड गोंधळ घालत रोखून धरले. त्यावेळी विरोधकांचा हा केवळ कांगावा असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले, राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ६ हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी २१०० कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य शासनाने १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधीपक्षांनी केल्यानंतर त्याला उत्तर देतांना जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या ६६०० कोटी रुपयांपैकी २१०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरीत केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासनाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ७४०० कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ७२०० कोटी रुपये अशी एकूण १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे इथे विरोधकांनी गोंधळ घालण्यापेक्षा केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांकडे आमच्याबरोबर येऊन शेतकऱ्यांनी तातडीने मदत कशी मिळेल ते पहावे इकडे कांगावा करण्याचे नाटक करु नये असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -