घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांना 'साले' बोलणाऱ्या भाजपचं धोरण घराघरात पोहचवा, जयंत पाटलांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांना ‘साले’ बोलणाऱ्या भाजपचं धोरण घराघरात पोहचवा, जयंत पाटलांचा हल्लाबोल

Subscribe

आपलं सरकार प्रभावीपणे काम करतंय हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे शिवाय विरोधकांनाही आपलं सरकार आहे हेही जाणवलं पाहिजे.

मोदी सरकारने परदेशातून तेल आयात केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळेनासा झाला आहे. मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे असा आरोप करतानाच याच मतदारसंघातील भाजपनेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना ‘साले’ बोलले होते हे विधान घराघरात पोचवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. एक वेळ असा होता की आपल्या पक्षात कोणी थांबत नव्हतं, लोकं पक्ष सोडून जात होते आज मात्र त्यांना पश्चाताप होतोय की राष्ट्रवादीत थांबायला हवं होतं. आपण पडत्या काळात पक्षासोबत होतात आजही आहात याबद्दल भोकरदनवासियांना जयंत पाटील यांनी धन्यवाद दिले.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलय की,२०२४ ला आपल्या अंगावर गुलाल पाडायचा असेल तर पक्षाचा विस्तार करा. जे पक्ष सोडून गेले आहेत आणि पुन्हा वापस येऊ इच्छितात अशांना सोबत घ्या, त्यांचे कुणी पक्ष सोडत असतील तर त्यांना आपल्या पक्षात घ्या. निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस डोक्यात ठेवून काम करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

- Advertisement -

मला मान्य आहे इथला कार्यकर्ता लढवय्या आहे मात्र आपण किती काळ लढाईच करणार? त्यामुळे २०२४ ला गुलाल राष्ट्रवादी काँग्रेसचाच असायला हवा असेही जयंत पाटील म्हणाले. राज्यात आणि दिल्लीत भाजपची सत्ता असल्याने डोक्यावरील सुर्य कधी मावळणार नाही अशा भ्रमात भाजप होती परंतु तो सुर्य मावळला आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

आपलं सरकार प्रभावीपणे काम करतंय हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे शिवाय विरोधकांनाही आपलं सरकार आहे हेही जाणवलं पाहिजे. भोकरदन मतदारसंघात चंद्रकांत दानवे म्हणतील ते झालं पाहिजे असं सर्व अधिकार्‍यांना राजेश टोपे तुम्ही सांगा असा आदेशच जयंत पाटील यांनी दिला राष्ट्रवादीच्या नेत्यांची तालुका पातळीवर प्रश्न सोडविण्यासाठीची भूमिका असली पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची भूमिका आग्रही राहिली पाहिजे.

- Advertisement -

भागाच्या विकासासाठी संपूर्ण पाठिंबा – राजेश टोपे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भोकरदन येथील संघटना ही प्रचंड लढवय्यी आहे, समोरच्या बाजूला मोठी ताकद असतानाही तोडीची झुंज राष्ट्रवादी इथे देत आहे. इथला प्रत्येक कार्यकर्ता हा संघर्ष करणारा आहे अशी शाब्बासकी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. माजी आमदार चंद्रकांत दानवे इथे प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करतात. रस्ते, वीज, पाणी या सर्व गोष्टींवर याबाबत मागणी करत असतात. आपला स्वतःचा आमदार नसल्याने इथे थोड्याबहुत प्रमाणात अडचण येते मात्र या भागाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचा संपूर्ण पाठिंबा आहे असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

भाजप ओबीसी आरक्षणाबाबत धादांत खोटा प्रचार करत आहे. ओबीसी समाजाच्या एकाही जागेला धक्का लागता कामा नये याची खबरदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे. त्यामुळे भाजपच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले. जालना जिल्ह्याचा विकास करण्यासाठी संपूर्ण शासन काम करत आहे. आज कोविडची परिस्थिती आहे त्यामुळे या भागाला नव्या कोऱ्या रुग्णवाहिका दिल्या आहे. राजेश टोपे जालनावासियांसोबत उभा राहिला होता, आजही उभा आहे आणि उद्याही उपस्थित राहील असे आश्वासनही राजेश टोपे यांनी दिले.


हेही वाचा :  मोठी बातमी ! राज्यातील थिएटर्स २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -