घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस नेहमी दिल्लीश्वरांना खुश करण्याच्या प्रयत्नात असतात - जयंत पाटील

देवेंद्र फडणवीस नेहमी दिल्लीश्वरांना खुश करण्याच्या प्रयत्नात असतात – जयंत पाटील

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नेहमी दिल्लीश्वरांना खुश करण्याच्या प्रयत्नात असतात, असा टोला, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. ते बेळगावमध्ये बोलत होते. बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. शिवेसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीने देखील महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठींबा दर्शवला आहे.

शिवसेनेचे खासदार आणि प्रकवक्ते संजय राऊत यांच्यानंतर जयंत पाटील बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या उमेदवाराल पाठींबा दिला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजपचा प्रचार केला. यावरुन जयंत पाटलांनी टोला लगावला. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्वरांना खुश करण्याच्या प्रयत्नात असतात, असा टोला लगावला. मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठींबा द्यायला हवा होता असं म्हणत जयंत पाटलांनी त्यांच्यावर निशाणा देखील साधला. यावेळी जयंत पाटील यांनी मराठी भाषिकांच्या न्याय-हक्कांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठींबा देत असल्याचं जाहीर केलं.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यामुळे बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीने अवघ्या २६ वर्षीय शुभम शेळके यांना मैदानात उतरवले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने शेळके यांच्यामागे सर्व ताकद लावली आहे. भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती अशी तिरंगी लढत बेळगावात होत आहे. मात्र, ही पोटनिवडणूक मराठी विरुद्ध कानडी अशीच लढली जात आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -