घरताज्या घडामोडीपश्चिम बंगाल व महाराष्ट्राचे एक ऐतिहासिक नाते, ममता बॅनर्जी यांच्या भेटीवर जयंत...

पश्चिम बंगाल व महाराष्ट्राचे एक ऐतिहासिक नाते, ममता बॅनर्जी यांच्या भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज(बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनतर त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये जे रस्त्यावर लढतील त्यांना सोबत घेऊन जाणार. देशातील सध्याची परिस्थिती पाहता चांगला विरोधी पर्याय तयार व्हायला हवा. युपीए सध्या अस्तित्त्वात नाही, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल व महाराष्ट्राचे एक ऐतिहासिक नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात सर्वाधिक योगदान या दोन राज्यांचं राहिलेले आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

जयंत पाटील यांनी बैठक झाल्यानंतर एक ट्विट देखील केलं आहे. पश्चिम बंगाल व महाराष्ट्राचे एक ऐतिहासिक नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात सर्वाधिक योगदान या दोन राज्यांचं राहिलेले आहे. संपूर्ण देशाला दिशा देण्याचे काम या दोन्ही राज्यांनी कायम केलेले आहे. आजही ही दोन्ही राज्ये राष्ट्रीय प्रवाहात एक वेगळी भूमिका घेऊन उभी आहेत. आदरणीय शरद पवार साहेब व ममतादीदी या प्रवाहाचे नेतृत्व करत आहेत. अशा प्रकारचं ट्विट हे जयंत पाटील यांनी केलं आहे.

- Advertisement -

आदरणीय शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, रणझुंजार नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासोबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहकार्‍यांसोबत सविस्तर व सकारात्मक चर्चा केल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात तासभर चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज देशात जी परिस्थिती आहे आणि हुकुमशाही देशात सुरू आहे. याविरोधात एक चांगला विरोधी गट तयार केला पाहीजे. यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. तसेच एक मजबूत विरोधक हवा आहे. असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -