घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, कोर्टाच्या निकालानंतर जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, कोर्टाच्या निकालानंतर जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

Subscribe

पुन्हा महाराष्ट्रातील राजकारणात नवं समीकरण पाहायला मिळणार की शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

बंडखोर आमदारांच्या अपात्रेवरील सुनावणीला आता सर्वोच्च न्यायालायने पुढील तारीख दिली आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. येत्या काळात उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं ते म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. पुन्हा महाराष्ट्रातील राजकारणात नवं समीकरण पाहायला मिळणार की शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Jayant Patil statement on supreme court decision about rebel mla disqualification)

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयातील शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या गटाच्या वकिलांचा युक्तिवाद; वाचा एका क्लिकवर

- Advertisement -

आजच्या सुनावणीतबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, घटनेच्या दहाव्या शेड्युलच्या आधारे कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीने युक्तीवाद केला. तर, दुसऱ्या बाजूने जो युक्तिवाद झाला त्याला जनरल कॉमन सेन्सचा आधार आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय घेईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधी जाण्याची जी कृती होती ती कायदेशीर होती, हे जे कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट आहे, ते जास्त योग्य होतं आणि आम्हाला विश्वास आहे, यात योग्य निवाडा होईल.

हेही वाचा – मोठी बातमी! 16 आमदारांच्या अपात्रतेवरची सुनावणी पुढे ढकलली, आता 1 ऑगस्टला पुढची सुनावणी

- Advertisement -

जयंत पाटील पुढे म्हणाले की, कोर्टाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन युक्तीवाद करण्यात आला. तो युक्तीवाद तयार केला होता, त्यापेक्षा वेगळा युक्तीवाद करण्याची गरज भासल्याने त्यांनी वेळ मागितला असावा. म्हणूनच, कोर्टाने दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्रे सादर करायला सांगितले आहे. आठ दिवसांनी पतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर योग्य निर्णय होईल. मात्र, सध्या राज्यात जे काही सुरू आहे, त्याची कोर्टाने दखल घेतली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -