घरदेश-विदेशसर्वांनी एकत्र बसून 'यूपीए'ची दिशा ठरवण्याची गरज - जयंत पाटील

सर्वांनी एकत्र बसून ‘यूपीए’ची दिशा ठरवण्याची गरज – जयंत पाटील

Subscribe

'यूपीए'च्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी होऊ लागली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सर्वांनी एकत्र बसून यूपीएची दिशा ठरवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह भाजप विरोधकांना मोठा फटका सहन करवा लागला आहे. पाचपैकी चार राज्यांत भाजपाला मिळालेल्या विजयावरून विरोधकांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. अशातच संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) अर्थात ‘यूपीए’च्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी होऊ लागली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सर्वांनी एकत्र बसून यूपीएची दिशा ठरवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

”देशातील युपीएचे अध्यक्ष सोनीया गांधीची आहेत. देशातल्या सर्व पक्षांचा विचारकरून सोनिया गांधींना अध्यक्ष केलं होतं. त्यामुळं यूपीएच्या मुद्दायवर सर्वांनी एकत्रित येऊन चर्चा करणं गरजेचं आहे. तसंच, यावर चर्चा झाल्यावर भाष्य करणं योग्य आहे”, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं.

- Advertisement -

सध्या यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं यूपीएची कमान राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडं सोपवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मांडला आहे. याआगोदरसुद्धा अनेक नेत्यांनी यूपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करावे अशी मागणी केली होती. परंतु, पहिल्यांदाच पार्टीशी संबंधित बैठकीत असा प्रस्ताव करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली होती. या बैठकीत महत्वाचा ठराव मांडण्यात आला. या बैठकीला खुद्द शरद पवारही उपस्थित होते. यावेळी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना देण्यात यावं असा ठराव सादर करण्यात आला आणि तो मंजूरही करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे.

- Advertisement -

भाजपा नेते आशिष शेलार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी हिंदु सणांना परवानगी देताना राज्य सरकारच्या हाताला लकवा मारतो का? असा सवाल विचारत सरकारवर टीका केली होती. यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं. ”भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये जातीय ऐंगल असतो आणि त्याचा फायदा राजकारणात कसा घ्यायचा याचा प्रयत्न असतो. या पलीकडे त्यांच्या कोणत्याही मागण्यात समजाचं हित, देशाचं हित फारसं गुंतलेलं नसतं, हा अनुभव आहे. तसंच, रामनवमी किंवा गुडीपाढवा हे हिंदुंचे सण आहेत, आम्ही सगळे हिंदुच आहोत. काही वेगळे नाही. आणि या सणांकडे बघण्याचा आमचा दृष्टीकोन जसा सण-सोहळा साजरा करतो, तसाच आहे”, असं म्हटलं

”यापुर्वी कोणत्याही धर्माचे सण आले, तरी कोरोनाच्या काळात कोरोनाच्या मर्यादा ठेवूनच सण साजरे करणं आवश्यक होतं. ज्याचा उल्लेख देशभर आज होतोय. महाराष्ट्रानं कोरोनाच्या काळाच उत्तम कामगिरी केली. आता कोरोनाची प्रादुर्भाव कमी असुन सणे साजरे करण्याबाबत आमचं सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी लक्षात घ्याव”, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.


हेही वाचा – शरद पवारांना यूपीए अध्यक्ष करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत प्रस्ताव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -