स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे महाविकास आघाडी होणार, राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरलं

jayant patil, जयंत पाटील

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचं काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. दरम्यान, काँग्रेसनेही आता महाविकास आघाडी फुटीचे संकेत दिले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार की सर्व पक्ष वेगवेगळे लढणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. दरम्यान, शक्य असेल तिथे महाविकास आघाडी करण्याच्या सूचना शरद पवारांनी आजच्या बैठकीत दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली. शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हरओक येथे आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. बैठकीनंतर जयंत पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा – जितेंद्र आव्हाड अडचणीत; अनंत करमुसेप्रकरणी कारणे दाखवा नोटीस

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडीतील सर्व पक्षांसोबत त्या त्या ठिकाणी बोलण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर देण्यात आले आहेत. शक्य असेल तिथे महाविकास आघाडी करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही आमच्यासोबत आहेत. नाना पटोले यांच्याशी बोलण्यानंतरच त्याबाबतची भूमिका स्पष्ट करता येईल, असं जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट, कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय

दरम्यान, आजच्या बैठकीत पक्षांतर्गत चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली. गणपती झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून राज्यस्तरावरचं अधिवेशन शिर्डीला घेण्यात येणार. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे अधिवेशन असेल. यासंदर्भात चर्चा करण्याची शरद पवारांनी बैठक बोलावली होती, असं पाटील म्हणाले.