माझी प्रकृती उत्तम, काळजी करण्याचे कारण नाही, रुग्णालयातून जयंत पाटील यांचं ट्विट

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

jayant patil reaction on chhagan bhujbal Maharashtra Sadan Scam case
भुजबळांबाबतच्या निर्णयावर समाधान, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले होते. अस्वस्थ वाटत असल्यामुळे जयंत पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होतं. जयंत पाटील यांनी आपली प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही असे ट्विट करुन प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. दरम्यान नियमीत तपासणीसाठी रुग्णालयात गेलो असल्याचे जयंत पाटील यांनी ट्विट करुन सांगितले आहे. जयंत पाटील यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपेही रुग्णालयात उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यमंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रुग्णालयात धाव घेतली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जयंत पाटील यांना दाखल केले आहे. जयंत पाटील यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील रुग्णालयात उपस्थित होते.

रुग्णालयातून जयंत पाटील यांचं ट्विट

दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करुन प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटल आहे की, “आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद” असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

पूर परिस्थितीचे नियोजन

राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील रात्रंदिवस आढावा घेऊन उपाययोजना करत होते. पूर परिस्थीतीवर कोयना नदी आणि अलमट्टी धरणातील पाण्याच्या नियोजनाची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर टाकण्यात आली होती. जयंत पाटील मध्य रात्री आणि प्रवासादरम्यानही अधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेत होते तसेच दक्ष राहण्याचे आवाहन करत होते. कोल्हापूर सांगली पूरपरिस्थितीवर जयंत पाटील नियंत्रण ठेवून धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत निर्णय घेत होते. जयंत पाटील यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाचाही दौरा केला होता. यावेळी त्यांनी पाण्यात उतरुन परिस्थितीचा आढावा घेतला.