Homeट्रेंडिंगMLC Election : जयंत पाटलांना पाडण्यात बविआ-सपा-एमआयएम-शेकापाचा हात! धर्मनिरपेक्षतेचा डोंगोरा पिटणाऱ्यांनीच तिसरा...

MLC Election : जयंत पाटलांना पाडण्यात बविआ-सपा-एमआयएम-शेकापाचा हात! धर्मनिरपेक्षतेचा डोंगोरा पिटणाऱ्यांनीच तिसरा उमेदवार पाडला

Subscribe

मुंबई – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीचा आनंद अल्पजीवी ठरला. लोकसभे पाठोपाठ झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या घटक पक्षाचा उमेदवार पराभूत झाला. तुमच्या लक्षात आलेच असेल की आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या पराभवाबद्दल बोलतोय. 11 जागा असलेल्या विधान परिषद निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात होते. महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे तीन. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाले मात्र महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर उभे असलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळली. जयंत पाटलांचा घात कोणी केला? तेच जाणून घेऊया.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. भाजपच्या एकाधिकारशाहीविरोधात महायुतीतील घटक पक्ष वगळता राज्यातील सर्वच लहानमोठ्या पक्षांनी एकजूट दाखवली. समाजवादी, डावे, शेतकरी कामगार पक्ष यांनी इंडिया आघाडीसोबत राहात धर्मनिरपेक्ष पक्षांना साथ दिली. जनतेने इंडिया आघाडीच्या धर्मनिरपेक्ष धोरणाला पाठिंबा दिल्याचे लोकसभा निकालातून दिसून आले. मात्र या पक्षांच्या आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेला बगल देत आमिषं, प्रलोभनाला बळी पडत महायुतीच्या उमेदवारांना साथ दिली का? हा प्रश्न पडावा असा निकाल समोर आला आहे.

- Advertisement -

शेकापाच्या आमदारानेच जयंत पाटलांकडे पाठ फिरवली 

जयंत पाटील यांना 12 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 12 मतांच्या पाठिंब्यावरच जयंत पाटलांची नाव होती. त्यामुळे मिळालेली 12 मते ही पवारांच्या राष्ट्रवादीचीच होती, की त्यांच्यातीलही एक आमदार फुटला? अशी शंका घेण्याला वाव उरतो. त्यावर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी आमची 12 मते जयंत पाटलांना मिळाल्याचे लागलीच स्पष्ट केले. मग शंकेची सुई वळते ती शेतकरी कामगार पक्षाचेच आमदार शामसुंदर शिंदेंकडे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार येथून 2019 मध्ये आमदार झालेले शिंदे पूर्वाश्रमीचे सनदी अधिकारी. आमदार झाल्यानंतर त्यांनी नांदेडमध्ये काही पक्ष विस्तार केला? पक्षाला उभारी मिळेल असे काही काम केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे २०२४ मध्ये पुन्हा निवडून येतील अशीही खात्री नाही. त्यामुळे भाजप-शिंदे गटाच्या आमिषाला बळी पडून त्यांनीच जयंत पाटलांची सोथ सोडल्याचे मानले जाते.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा भाजपने त्यांच्या सर्व आमदारांना मुंबईतील एका हॉटेलात मुक्कामी ठेवले होते, तेव्हा त्यात भाजपेतर आमदारांमध्ये शिंदेसुद्धा होते अशी माहिती होती. तेव्हापासूनच श्यामसुंदर शिंदे भाजपसोबत संधान बांधून आहे.. त्यामुळे जयंत पाटलांचा विश्वासघात त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने केलाय का, हे त्यांनी तपासले पाहिजे.

Jayant Patil
धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणाऱ्यांनीच भाई जयंत पाटलांचा विश्वासघात केला का?

धर्मनिरपेक्ष पक्षांच्या आमदारांची मते गेली कुठे? 

भाजपवर कायम टीका करणारे. भाजपला धर्मांध शक्ती म्हणणारे समाजवादी पक्ष आणि एमआयएम यांनी जयंत पाटलांना साथ देण्याचे कबुल केले होते. मात्र या दोन्ही पक्षाच्या प्रत्येकी दोन्ही आमदारांनी पाटलांचा विश्वासघात करत त्यांना धोकाच दिल्याचे दिसून आले.

समाजवादी पक्षाचे आबु आझमी यांच्यावर ईडी आणि तत्सम यंत्रणांची नजर आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी महायुतीला साथ दिल्यानंतर त्यांच्या मागे असलेला चौकशीचा ससेमिरा संपला आहे. हेच गृहितक मांडत आबू आझमी आणि त्यांचे सहकारी

भिवंडी पूर्व विधानसभेचे आमदार रईस शेख यांनी सर्व तत्व, विचार बाजूला ठेवून पुढील निवडणुकीसाठी आर्थिक बेगमी करुन घेतल्याचेच उघड होत आहे. हेच उठसूठ रोज भाजपचा विरोध करणाऱ्या एमआयएमचे धुळ्यातील आमदार फारुक शाह, मालेगाव मध्यचे मोहम्मद इस्माईल यांनी देखील आपले उखळ पांढरे करुन घेतल्याचा आरोप होत आहे.

जयंत पाटील कुठे कमी पडले? 

जयंत पाटील हे विधान परिषदेचे ऐवढी वर्षे सदस्य होते. तेव्हा या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही, या भ्रमात ते देखील नव्हते. त्यांचीही ती तयारी होतीच. मात्र सत्ताधाऱ्यांकडून मिळालेले आमिष हे जयंत पाटलांपेक्षा अधिक आणि तपास यंत्रणांना रोखून धरण्याची ताकद ही सत्ताधाऱ्यांमध्येच. त्यामुळे आपले-आपले म्हणणाऱ्या शेकाप, समाजवादी आणि एमआएमच्या आमदारांनी भाई जयंत पाटलांचा घात केला. धर्मनिरपेक्ष आघाडीनेच नितीमत्ता सोडली. माकपचे निकोले यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि मिलिंद नार्वेकरांना मत दिले.

वसई, विरार, पालघरमधील दबदब्यासाठी… 

बहुजन विकास आघाडीची तीन मतंही निर्णायक होती. त्यांनीही जयंत पाटलांना शब्द दिला होता. कारण फक्त पवारांच्या 12 मतांवर जयंत पाटील निवडून येणार नव्हते. त्यांना मतांची बेगमी याच छोट्या पक्षांकडून करायची होती. या सर्व पक्षांची विधान भवनात कार्यालये देखील शेजारी शेजारी आहेत. मात्र हिंतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांनी बोईसरचे राजेश पाटील, नालासोपाराचे क्षितिज ठाकूर आणिवसईतून स्वतः हितेंद्र ठाकूर आमदार आहेत. या तिन्ही आमदारांनी आधी भाजप कार्यालयात भेट दिली आणि नंतर मतदानाला गेले. मी ज्यांना मतं देतो ते निवडूनच येतात असे सांगून त्यांनी त्यांचे मत कोणाला गेले हेच स्पष्ट केले. हितेंद्र ठाकूर यांना वसई, विरार, पालघर या पट्ट्यात दबदबा कायम ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत राहणे आवश्यक आहे, तेच त्यांनी केले.

काँग्रेसने दिला हात, धर्मनिरपेक्षांकडून दगाफटका 

काँग्रेसकडे 37 मतं आहेत. त्यातील पहिल्या पसंतीची 30 मतांचा कोटा प्रज्ञा सातव यांना देण्यात आला होता. तर दोन मते मिलिंद नार्वेकर आणि पाच मते जयंत पाटील यांना दिली जायची होती. पण सातव यांना प्रत्यक्ष २५ मतेच मिळाली. काँग्रेसची पाच मते फुटली. धर्मनिरपेक्ष पक्षांची 9 आणि राष्ट्रवादीची 12 मते मिळाली असती तर दोन ते तीन मतांचीच तजवीज जयंत पाटील यांना करायची होती. हेच गणित त्यांनी शरद पवारांना दिले होते. आघाडीत राहून काँग्रेसनेच हात दिला आणि आघाडीचे घटक पक्ष असलेल्या छोट्या पक्षांनीही महाविकास आघाडीला दगाफटका केलाय. हे आता उघड झाले आहे.

हेही वाचा : Awhad on Ajit Pawar : आघाडीत मीठ कसे टाकायचे हे अजितदादांकडून शिकावे, आव्हाडांचा थेट हल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -