घरमहाराष्ट्रहे चाळे कोण करतंय राज्याला कळू लागलंय..., जयंत पाटलांचा रोख कोणाकडे?

हे चाळे कोण करतंय राज्याला कळू लागलंय…, जयंत पाटलांचा रोख कोणाकडे?

Subscribe

जाणीवपूर्वक हे चाळे कोण करतंय हे राज्याला आता कळू लागले आहे, असे मत व्यक्त करत जयंत पाटील शरद पवार यांना मिळालेल्या धमकीवरून संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर फेसबुकवर “शरद पवार तुमचा दाभोलकर होणार” असे पोस्ट करत धमकी देण्यात आली. यानंतर तत्काळ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तर या प्रकरणी योग्य ती कारवाई करत आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आता राजकीय स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर जाणीवपूर्वक हे चाळे कोण करतंय हे राज्याला आता कळू लागले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत; गृहमंत्री फडणवीसांकडून पोलिसांना कारवाईचे निर्देश

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांना धमकी देणारा भाजपा कार्यकर्ता आहे असं तो म्हणतोय. अलिकडे ट्विटरवर असे काही लिखाण करणाऱ्यांना, अशा ट्विटर हँडल्सना मोठमोठे लोक फॉलो करतात आणि प्रोत्साहन देतात. त्यामुळे अशा प्रवृत्त्या वाढवून अशा प्रकारचं राजकारण निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात आणि देशात सुरू आहे. परंतु आपलं राज्य पुरगोमी आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सुजाण आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक हे चाळे कोण करतंय हे राज्याला आता कळू लागलंय. असे ते म्हणाले. पण त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता हे मात्र कळू शकलेले नाही.

अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवल्या पाहिजेत. या घटनेकडे सोशल मीडियावरचं लिखाण समजून साधी किंवा हलकी कलमं लावून त्या व्यक्तीला सोडून देण्याचा प्रयत्न कृपा करून कोणीही करू नये. त्यांना शिक्षा देण्याचं प्रयोजन सरकारने करावं. अशी मागणी यावेळी जयंत पाटील यांनी केली. तर यासोबतच ट्वीटवरून देखील जयंत पाटील यांनी पवार कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. “विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे. अधिकाराचा गैरवापर कशाला करायचा? कारण नसताना एका राष्ट्रीय नेत्याबद्दल अशाप्रकारे बदनामीकार बोलण्याचा अधिकार कोणी दिला.? असे अजित पवार प्रसार माध्यमांसमोर म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -