घरताज्या घडामोडीसोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या बदलीबाबत जयंत पाटील यांचा खुलासा, म्हणाले बैठकीत....

सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या बदलीबाबत जयंत पाटील यांचा खुलासा, म्हणाले बैठकीत….

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री पदावरुन हटवण्याबाबत चर्चा सुरु होता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे. उजनी धरणाच्या पाण्यावरुन झालेल्या वादामुळे पालकमंत्री बदलण्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. सोमवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे पालकमंत्री बदलणार का याबाबत तर्क वितर्क लढवण्यात आले. परंतु यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यानी चर्चांवर विरजन घातले आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेच राहतील असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पालकमंत्री बदलीच्या चर्चांना ब्रेक लावला आहे. दत्तात्रय भरणेच सोलापूरचे पालकमंत्री असणार आहेत. असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. याबाबत दत्तात्रय भरणे यांनीही माहिती दिली आहे. तसेच उजनी पाणी प्रश्नाचा वाद मागेच मिटला असल्याचेही सांगितले आहे.

- Advertisement -

उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापुरला वळवण्याची मंजुरी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही या योजनेला मंजुरी दिली होती तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचाही सहभाग यामध्ये होता. परंतु सोलापुरच्या शेतकऱ्यांनी या योजनेला विरोध केल्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलाची मागणी आणि चर्चा सुरु झाली होती. शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे आणि सोलापुरच्या शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निर्णय रद्द केला आहे. निर्णय रद्द केला असल्याचे जलसंपदा विभागाकडून १९ मे रोजी जाहीर करण्यात आले आहे.

आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून सन्यास घेईल

सोलापूरचे पालकमंत्री आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर उजनी धरणाचे ५ टीएमसी पाणी इंदापुरला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवर दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उजनी धरणाचे पाणी इंदापुरला पळवल्याचे आरोप केले जात आहेत. परंतु जर हे आरोप सिद्ध झाले तर राजकीय सन्यास घेईन. आमदारकीचाही राजीनामा देऊन सन्यास घेणार असे भरणे यांनी म्हटलंय. माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकरी कधी हिरावून घेणार नाही असेही आमदार दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -