घरमहाराष्ट्रकाम होण्यासाठी लोकांचा शिंदे गटात प्रवेश, जयंत पाटील यांची खोचक प्रतिक्रिया

काम होण्यासाठी लोकांचा शिंदे गटात प्रवेश, जयंत पाटील यांची खोचक प्रतिक्रिया

Subscribe

सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु, याबाबत जेव्हा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून ते शिवसेना पक्षाच्या नावापासून ते चिन्हापर्यंत सर्वच काही काबीज केले. पण आता त्यांच्या नेतृत्वात अनेक पक्षातील लोक हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. तर लवकरच गेल्या एक ते दीड वर्षांपासून खोळंबलेल्या महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि खासदार सुप्रिया सुळे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. पण त्याआधीच सोलापूरात पक्षाला मोठे खिंडार पडले असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु, याबाबत जेव्हा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूरच्या दौऱ्यावर असलेल्या जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पक्ष सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने लोक त्यांची कामे करून घेण्यासाठी शिंदे गटात जात आहेत. ही पक्षांतर करणारी लोक तात्पुरती पक्षांतर करत आहेत.

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शिंदे गटात किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणारी लोक ही पुन्हा आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. याबाबतची आताच मला माहिती मिळाली. शिंदे गटात जे गेलेले आहेत, ते तात्पुरते गेलेले आहेत. त्यांना एकनाथ शिंदे हे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत काही सोयी-सुविधा, सवलती मिळण्याची शक्यता असल्यामुळे ते तिथे गेलेले आहेत, असे म्हणत तिथे गेलेल्या लोकांबद्दल आम्ही फारसं काही बोलत नाही, असा टोला त्यांच्याकडून लगावण्यात आला आहे.

तर, एका कार्यकर्त्याने तर मला सांगितले की, साहेब एक सहा महिने जातो. जरा निधी आणतो आणि परत येतो. मी हे एका महत्त्वाच्या कार्यकर्त्याने सांगितलेले आपल्या सांगतोय. त्याने नगरपालिकेच्या कामांसाठी निधी मिळावा यासाठी पक्ष सोडून तिथे प्रवेश केला. त्या कार्यकर्त्याला मी जाऊन या असे सांगितले, असे यावेळी जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

भाजप पक्षात निष्ठावंत नेते अस्वस्थ

गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील अनेक महत्त्वाच्या अनेक नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश ईडीच्या भितीने करण्यात आल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले आहे. पण यामुळे आता भाजपमधील पंकजा मुंडे आणि काही नेत्यांच्या मनात मात्र नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. पण आता या मुद्द्यावरून जयंच पाटील यांनी मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आणि आता शिवसेनेचे (शिंदे गट) आमदारही कधी स्वतःला भाजपमध्ये विलीन करतील सांगता येत नाही. त्यामुळे आता भाजपमध्ये निष्ठावंत असलेल्यांमध्ये अस्वस्था दिसून येत आहे.

त्यामुळे जर तर प्रश्नांना आता उत्तर देण योग्य नाही. जेव्हा पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येण्याचा विचार करतील, तेव्हा याबाबत बोलेल असे उत्तर यावेळी जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -