घरताज्या घडामोडीकृष्णा नदीवरील पुलासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर, जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कृष्णा नदीवरील पुलासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर, जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Subscribe

महापुराच्यावेळी आलेल्या कटू आठवणी उराशी बाळगत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आता समाधानही व्यक्त केले

अखेर गेल्या अनेक वर्षांपासूनची शिरगाववासियांची कृष्णा नदीवरील पुलाची मागणी पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून पूर्ण होणार असून शिरगाववासियांनी पालकमंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत. कृष्णा नदीला पूर आल्यानंतर शिरगाववासियांचा तालुक्याशी संपर्क तुटत होता. पूरपरिस्थितीत येणाऱ्या अडचणी शिरगाववासियांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडल्या होत्या. शिवाय सांगली जिल्हयात महापूर आला होता तेव्हा खुद्द जयंत पाटील यांना शिरगाव वासियांपर्यंत मदत पोचवताना अडचणी आल्या होत्या.

इस्लामपूर – वाळवा मतदारसंघातील शिरगाव हे एकमेव गाव कृष्णा नदीच्या पल्याड आहे. पावसाळ्यात तेथील नागरिकांना दळणवळणाच्यादृष्टीने प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळेच पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांच्या पुलाच्या मागणीचा केंद्राकडे पाठपुरावा केला आणि आता केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत या मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. महापुराच्यावेळी आलेल्या कटू आठवणी उराशी बाळगत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आता समाधानही व्यक्त केले आहे.

- Advertisement -

याशिवाय केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत आष्टा – दुधगाव – कुंभोज पुलापर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही ३.९६ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आष्टा – दुधगाव परिसराचा थेट कोल्हापूर जिल्हयाशी दळणवळणासाठी संबंध येणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -