घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक-पवन एक्सप्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरले, एक्सप्रेसमधील काही प्रवाशी जखमी

नाशिक-पवन एक्सप्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरले, एक्सप्रेसमधील काही प्रवाशी जखमी

Subscribe

नाशिक पवन एक्सप्रेसचे अकरा डब्बे रुळावरून घसरले असल्याची माहिती समोर येतेय. देवळाली- लहवी दरम्यान ही दुर्घटना घडली असल्याची माहिती मध्य रेल्वेने ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. यासह या अपघातादरम्यान काही प्रवाशी जखमी झाल्याची देखील माहिती समोर येतेय मात्र किती प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच सुदैवाने कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाला नाहीये. दरम्यान रेल्वे स्थानकावरील कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल होत लोकांना मदत करण्यास पोहोचले आहेत. माहितीनुसार दरभंगा ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान ही एक्सप्रेस प्रवास करते. मात्र यादरम्यान रविवारी दुपारी या एक्सप्रेसचा अपघात झाला आहे. रेल्वे रुळावरून अकरा डब्बे घसरले आहेत. डब्यामध्ये काही प्रवाशी असल्याची माहिती देण्यात आलीये. अपघातामध्ये प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत मात्र दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहेत.

ज्या ठिकाणी या एक्सप्रेसचा अपघात झाला त्याठिकाणचा परिसर अज्ञात असल्याने मदत कार्य पोहोचण्यास काहीसा उशीर झाला. मात्र रेल्वे अधिकारी सर्व खबरदारी बाळगत आहेत.

- Advertisement -

सुमारे 3 वाजून 10 मिनिटांनी ही घटना घडली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 11061 LTT जयनगर एक्सप्रेसचे डबे लहवी आणि देवळाली नाशिकजवळच्या रुळावरून घसरले आहेत. सध्या प्रवाशांना तसेच अपघातग्रस्तांना सुखरुप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या संदर्भातील माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -
पवन एक्सप्रेसचा अपघात झाल्याने अनेक रेल्वेमार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच काही एक्सप्रेस मेल रद्द देखील करण्यात आल्या आहेत. 

Trains Update-3 – Derailment of 11061 Express

Trains cancelled/diverted/short terminated due to derailment of 11061 LTT-Jaynagar Express near Nashik:

A) CANCELLED

1) 17057 CSMT Mumbai – Secunderabad Devgiri Express JCO 03.04.2022
2) 17612 CSMT Mumbai – Hazur Sahib Nanded Rajyarani Express JCO 03.04.2022
3) 17611 Hazur Sahib Nanded – CSMT Mumbai JCO 04.04.2022
4) 12145 Lokmanya Tilak Terminus – Puri Express JCO 03.04.2022
5) 12146 Puri – Lokmanya Tilak Terminus Express JCO 05.04.2022
6) 12111 CSMT Mumbai – Amravati Superfast Express JCO 03.04.2022
7) 12112 Amravati – CSMT Mumbai Superfast Express JCO 03.04.2022

B) DIVERSION
1) 12809 CSMT Mumbai – Howrah Express JCO 03.04.2022 diverted via- Kalyan – Lonavala- Pune – Daund Chord Line – Manmad and onwards proper route
2) 12143 Lokmanya Tilak Terminus – Sultanpur Express JCO 03.04.2022 diverted via- Vasai Road – Surat – Jalgaon and onwards proper route

C) SHORT TERMINATED
1) 17058 Secundrabad – CSMT Mumbai Devgiri Express JCO 03.04.2022 short terminated at Nagarsol
2) 11402 Adilabad – CSMT Mumbai Nandigram Express JCO 03.04.2022 short terminated at Nagarsol

 


हे हि वाचा – ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणणारे नोटीशीमुळे बदलले याच आश्चर्य, सुप्रीया सुळेंची राज ठाकरेंवर टीका

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -