Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बीड: आजारी बाळाला घेऊन जाणाऱ्या जीपचा अपघात; दोन जण जागीच ठार

बीड: आजारी बाळाला घेऊन जाणाऱ्या जीपचा अपघात; दोन जण जागीच ठार

Related Story

- Advertisement -

बीडमधील परळी मार्गावर जरुड फाट्याजवळ जीपचा भीषण अपघात झाल्याचे समोर आहे. आजारी बाळाला घेऊन जाणारी जीप आज, सकाळी पहाटे दुसऱ्या जीपला जोरात धडली. या दुर्घटनमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुदैवाने दोन वर्षांचे आजारी बाळ आणि त्याचा वडिलांचा जीव थोडक्यात बचावल्याची माहिती मिळत आहे.

बीड शहरापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या जरूड फाट्याजवळ आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन जीपची समोरासमोर धडक झाली. तापाने फणफणलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याला जीपमधून (MH-06 AS-0467) कुटुंब बीडच्या रुग्णालयात घेऊन जात होते. त्याचदरम्यान परळीकडे भाजीपाल घेऊन जाणारी मालवाहू जीप (MH 25 AJ-3403) जात होती. त्यावेळी भाजीपाला वाहून नेणाऱ्या जीप चालकाचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात झाला. यात जीप १०० ते १५० किलोमीटर उलटली. या अपघातामध्ये दीर आणि भावजय जागीच ठार झाले. पण सुदैवाने अपघातानंतर मुलगा आणि वडील बाहेर झेपावले. त्यामुळे या दोघांचा जीव वाचवला आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

रवि नागोराव मिटकर (वय २६), सोनाली माधव मिटकर (वय ३०) असे मृत्यू झालेल्या दीर-भावजयची नावे आहेत. तसेच गौरव माधव मिटकर (२ वर्ष) आणि माधव नागोराव मिटकर (वय ३५) या दोघा बाप-लेकाचा जीव थोडक्यात बचावला आहे. तर चालक विशाल अर्जुन मिटकर (वय २७) हा जखमी झाला आहे.


हेही वाचा – साकीनाका प्रकरण: अ‍ॅट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल; कुटुंबियांना २० लाखांची आर्थिक मदत


- Advertisement -

 

- Advertisement -