Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे Jijau Nagar : पिंपरी चिंचवड पण आता नको; नाव बदलण्याची होतेय मागणी

Jijau Nagar : पिंपरी चिंचवड पण आता नको; नाव बदलण्याची होतेय मागणी

Subscribe

 

पुणेः पिंपरी चिंचवडचे नाव बदलून जिजाऊनगर करावं, अशी मागणी करणारे बॅनर संपूर्ण शहरात लागले आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे पुतणे महेश बारणे यांनी लाखो रुपये खर्च करुन ही बॅनरबाजी केली आहे. याला खासदार बारणे यांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यवार आला आहे.

- Advertisement -

दुसरीकडे पुण्याचे नाव बदलून जिजाऊनगर करा, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. तर पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन स्वतंत्र जिल्हा स्थापन करा आणि नवीन जिल्ह्याला शिवनेरी नाव द्या, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे आता पुण्याच्या नामांतरावरुन राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

नवीन जिल्हा झाला तर बारणे यांचा मतदारसंघ बाद होईल. त्यामुळे मतदारसंघ वाचवण्यासाठी शहराचं नाव बदलण्याचा घाट घातला जात आहे. तर भाजपकडून थेट जिल्ह्याच्या विभाजनाचीच मागणी पुढे येत आहे. त्यामुळे नक्की शहराचं नाव बदललं जाणार की जिल्ह्याचंच विभाजन होणार याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

अहमदनगरचे नाव होणार अहिल्यादेवीनगर

- Advertisement -

अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी होळकरनगर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान चौंडी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यानंतर अहमदनगरचे नामांतर होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांचं माहेरचं आडनाव शिंदे आहे. मी पण शिंदेच आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी करावे, अशी मागणी राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांनी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही तीच ईच्छा होती. त्यामुळे आम्ही अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकरनगर करत आहोत. तसा निर्णयच राज्य शासनाने घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहिर केले.

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर अडकले न्यायालयात

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात दाखल झालेल्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत संभाजीनगर व धाराशीव नाव सरकारी दफ्तरी वापरले जाणार नाही, अशी हमी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी राज्य शासनाच्यावतीने उच्च न्यायालयात दिली आहे. औरंगाबाद जिलह्याचे संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत २९ जून २०२२ रोजी मंजूर केला होता. हा निर्णय घेतल्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकराने उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द करून औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा निर्णय घेतला. पुढे हा प्रस्ताव केंद्रकाकडे पाठवण्यात आला आहे. केंद्राने मंजूरी दिल्यानतंर १७ जुलै २०२२ रोजी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने अधिसूचना काढून औरंगाबाद जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गावाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशीव’ असे करण्यात आले. त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.

- Advertisment -