घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर'जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी'; एल्गार सभेतून वडेट्टीवारांचा हल्लाबोल

‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी’; एल्गार सभेतून वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Subscribe

जालना जिल्ह्यातील अंबड येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यावरून हल्लाबोल केला.

अंबड (जालना) : जालना जिल्ह्यातील अंबड येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यावरून हल्लाबोल केला. ते म्हणाले आज उपस्थित असलेले हे ओबीसी बांधव एकूणच हे पिवळं वादळ अनेकांना पिवळं केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं हे वादळ आलेलं आहे. आजची ही सभा ओबीसीच्या हक्काला यापुढेही कुणीही धक्का लावणार नाही अशी ही ऐतिहासिक सभा आहे. जर आम्ही ओबीसीच्या हक्कासाठी लढत असू आणि आम्हाला कुणी धमकी देत असेल तर आम्ही सत्तेला लाथ मारू, कारण, सत्ता येत असते आणि जात असते पण आम्हाला जगावं लागणार आहे ते या आमच्या समाजासाबोत असे म्हणत त्यांनी ओबीसीसाठी पद, सत्ता सोडण्याचाही निर्धार यावेळी बोलून दाखवला. (Jiski jitni narwar bhari uski otni haisdari Wadettivar attack from Elgar meeting)

आमचा 350 जातीचा समाज आहे हा. पडळकरांनी सांगितल्याप्रमाणे चला आमच्या वाड्या, वस्त्यांवर चला, आमचा बांधव कसा जगतो हे बघा, तुम्ही म्हणता आमच्या शेती कमी झाल्या आहेत. पण ज्यांच्याकडे शेतीच नाही अशांची काय अवस्था असेल याचा कधी याचा विचार केला का? मी छगन भुजबळ यांना विनंती करतो की, चला आपण सगळे पंतप्रधानाना जाऊन भेटू आणि त्यांना जातीनिहाय जनगणना करण्याचे आवाहन करू, कारण, जातीनिहाय जनगणनेनंतरच स्पष्ट होईल की, कोण किती आहेत. तेव्हा जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे केला. तर पुढे ते बोलताना म्हणाले की, आज या सभेला तुम्ही आलात तुमच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आले आहात. येथे पक्षाचा विचार नाही, जो ओबीसी के हित की बात करेगा वही अपने दिल मे रहेगा असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ओबीसीच्या हिताचा मुद्दा येथे लावून धरला. तर लहान भावाच्या ताटातील काढलं तर तुम्हाला तुमची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही असे म्हणत मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणुत्र देण्यावरून त्यांनी विरोध दर्शवला. त पुढे बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण गाव वाचवा, तेव्हाच तुमचे घर वाचेल, बीडमध्ये काय घडलं हे तुम्ही पाहलच आहे. द्वेष आणि विष पेरण्याचं काम तुम्ही करतायेत. तर आता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला तर आम्ही स्वस्त बसणार नाही असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला.

- Advertisement -

हेही वाचा : OBC एल्गार : जालन्यात ओबीसींचा महामेळावा; भुजबळ, वडेट्टीवार, पंकजा मुंडे राहणार उपस्थित

अंबडची सभा तुंबड, आता जिल्ह्या जिल्ह्यात सभा

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, चिंता आम्ही करत नाही, आणि पुढेही करणार नाही, ओबीसीच्या न्याय हक्कासाठी येथे निधड्या छातीने आलो आहे. अंबडची सभा तुंबड झाली, आता यापुढे जिल्ह्या जिल्ह्यातून एल्गार उभा करावा लागणार आहे. कोणत्या सुभेदाराचे, जहांगीरदाराचे पैसे घेऊन तुम्ही आला नाहीत. आता यापुढे जिल्ह्या जिल्ह्यात मेळावे घेऊ असे म्हणत त्यांनी इतर समाजाच्या सभांवर टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -