घरमहाराष्ट्रभगवद्गीतेवर 'आव्हाड' सोशल मीडियावर ट्रोल

भगवद्गीतेवर ‘आव्हाड’ सोशल मीडियावर ट्रोल

Subscribe

जिंतेद्र आव्हाड भगवद्गीता प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मला गीता पूर्णपणे तोंडपाठ आहे असे म्हणाले आणि गीतेतला श्लोक म्हणतानाच ते अडखळले त्यांच्या या प्रकारावर आता सोशल मीडियावर प्रतिक्रीया उमटत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालयात भगवद्गीता वाटण्याच्या निर्णयावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एक मोठं राजकारण पाहायला मिळत आहे. मुंबई उच्च शिक्षण संचालन मंडळाने हे परीपत्रक काढले होते ज्यामध्ये मुंबईत असणाऱ्या अशासकीय मान्यता असणाऱ्या १०० महाविद्यांलयात भगवद्गीता वाटपाचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयावर अनेक विरोधकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. ज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंन्द्र आव्हाड यांचाही समावेश होता. काल नागपूर अधिवेशनात पत्रकारांनी या विषयावर त्यांना प्रश्न विचारले असता मला संपूर्ण गीता तोंडपाठ आहे असं उत्तर त्यांनी  दिले होते. त्यांच्या या उत्तरावर गीता म्हणून दाखवा असा प्रतिप्रश्न पत्रकारांनी केल्यानंतर जिंतेंद्र आव्हाड पुरते गडबडले.त्यांनंतर फेसबुकवर लाईव्ह करत याची सारवासारव करण्याचा प्रयत्न आव्हाडांनी केला पण ते ईथेही गडबडल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली म्हणुन त्यांनी तो व्हिडिओ हटवला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले ‘यदा यदा शी धर्मस्य’

भगवद्गीतेत असणारा श्लोक ‘यदा यदाही धर्मस्य’ असं म्हणण्याऐवजी यदा यदा शी धर्मस्य असं जितेंद्ग आव्हाड म्हणाले आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवायला सूरुवात केली. गीता येतचं न्हवती तर ती पाठ आहे अशी खोटी बतावणी करण्याची काय गरज होती असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला आहे. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला बाजूला ये संपूर्ण गीता म्हणून दाखवतो असे बोलल्यामुळे ते आता पुरते अडचणीत आले आहेत.

- Advertisement -

आव्हाडांची फेसबुकवरुन सारवासारव

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर लाईव्ह करत या प्रकरणाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण नेटकऱ्यांना त्यांची ही सारवासारव अजिबात आवडली नसल्याचे पाहायला मिळत आहे. माणसाकडून चूक होते पण माध्यमांनी उगाचच हा विषय ताणून धरला आणि मला बदनाम केले असल्याचे आव्हाड म्हणाले होते.पण नेटकऱ्यांनी यावरुनसुध्दा त्यांनी ट्रोल केल्यामुळे त्यांनी त्यांचा तो व्हिडिओ फेसबुकवरुन हटवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -