घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राला 'वेड्यात' काढलं जातयं...; जितेंद्र आव्हाड पुन्हा आक्रमक

महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं…; जितेंद्र आव्हाड पुन्हा आक्रमक

Subscribe

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारत आहे. त्याच्या या भूमिकेवरून आता प्रेक्षकांकडून सिनेमाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारत आहे. अक्षय कुमारच्या या भूमिकेवरून आता प्रेक्षकांकडून सिनेमाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अशातच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमावर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर शिवछत्रपतींची काही चित्र शेअर करत या चित्रपटावर टीका केली आहे. तसेच, महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं असं वाटतं’, असे लिहिले आहे. (Jitendra Avhad Tweet On Vedat Marathe Veer Daudale Saat After Akshay Kumars Look In The Movie)

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीन चित्र आहेत. ही चित्र शेअर करत आव्हाड यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमावर टीका केली. “जर्मनी, पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं असं वाटतं”, असे जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले. या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता अक्षय कुमारच्या लूकवर टीका केली आहे.

- Advertisement -

याशिवाय, या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेवर चाहतेही नाराज झाले आहेत. “एखाद्या मराठी कलाकाराने ही भूमिका साकारायला हवी होती. अनेकांना अक्षयचा लूकही आवडलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर जे तेज होतं, ते अक्षयच्या चेहऱ्यावर अजिबात नाही”, अशा शब्दात चाहते त्याला ट्रोल करत आहेत.

दरम्यान, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमातील मावळ्यांचा लूक शेअर केल्यानंतर त्यावर जितेंद्र आव्हाड यांच्या व्यतिरिक्त अनेकांनी आक्षेप घेतला होता. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही या सिनेमावर आक्षेप घेतला. या चित्रपटातील मावळ्यांच्या वेशभूषेवर संभाजीराजेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपा नेते प्रसाद लाड यांचे भारतीय लष्कर ध्वज दिनाचं ट्वीट वादात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -