घरठाणेसंघर्षाने गमावलेले हक्क मिळतात, संजय राऊतांच्या अटकेवरून जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

संघर्षाने गमावलेले हक्क मिळतात, संजय राऊतांच्या अटकेवरून जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

Subscribe

संघर्षाने गमावलेले हक्क मिळतात, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

पत्राचाळ पुनविकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊतांच्या घरी रविवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. त्यांच्या घरी अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. यानंतर त्यांची सुमारे 17 तास चौकशी करून त्यांना ईडीने अटक केली. या अटकेवर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन प्रतिक्रीया दिली आहे.

ट्वीटमध्ये काय? –

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी सूचक असं ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमधून त्यांनी संजय राऊत यांनी सिंहाची उपमा दिली आहे.  संजय राऊत यांना ED ने अटक केल्यानंतरच त्यांनी हे ट्वीट केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते वाक्य आहे, जे आव्हाड यांनी शेअर केले आहे.

या ट्विटमध्ये गमावलेले हक्क अन्याय करणाऱ्या लोकांच्या विवेकबुद्धीला आवाहन करून परत मिळत नसतात, तर सतत संघर्षाने मिळतात. बोकडांना समारंभपूर्वक बळी दिले जाते, सिंहांना नाही! – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, असे म्हंटले आहे.

- Advertisement -

काय घडले –

आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत तसेच ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी ईडीला दिल्याचे समजते. मात्र, अधिकाऱ्यांना झडतीत दुसरी काही कागदपत्रे सापडली आहेत. १९ जुलै आणि २७ जुलै असे दोनदा ते ईडीच्या चौकशीला अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर, ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून राऊत यांना अटक केली. ईडी अधिकाऱ्यांसमवेत घरातून गाडीत जाताना राऊत यांनी भगवा गमछा दाखवत शिवसैनिकांना आणि माध्यमांना हात उंचावून दाखवला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -